28 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरदेश दुनियाकुरापती चीनकडून अक्साई चीनपर्यंत रस्ते, कॅम्प, हेलिपॅड्सची उभारणी

कुरापती चीनकडून अक्साई चीनपर्यंत रस्ते, कॅम्प, हेलिपॅड्सची उभारणी

सॅटेलाईट इमेजवरून ब्रिटीश थिंक टँक चीथम हाऊसचा दावा

Google News Follow

Related

कुरापती चीनचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. चीनने अक्साई चीनपर्यंत रस्ते, चौक्या, हेलिपोर्ट आणि कॅम्प स्थापन केल्याचा दावा ब्रिटिश थिंक टँक चीथम हाऊसने केला आहे. या दाव्यानुसार चीनने याठिकाणी नवीन पुरवठा मार्ग तयार करण्याचा घाट घातला आहे. याद्वारे चीन आपत्कालीन परिस्थितीत याठिकाणी सैन्य पाठवू शकतो.

चीथम हाऊसने गेल्या सहा महिन्यांतील उपग्रह छायाचित्रांच्या विश्लेषणाच्या आधारे हा अहवाल दिला आहे. चीनने १९६२ च्या युद्धानंतर अक्साई चीनचा भाग आपल्या ताब्यात घेतला होता.

थिंकटँकने ऑक्टोबर २०२२ पासूनच छायाचित्रांद्वारे चीनच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. अक्साई चीन तलावाजवळील वादग्रस्त भागात हेलिपोर्ट बांधण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. चीन येथे १८ हँगर आणि लहान धावपट्टी बांधत आहे, जिथे आपत्कालीन परिस्थितीत ड्रोन, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने उड्डाण करू शकतात. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) रस्त्यांचे रुंदीकरण केल्याचे चित्रांवरून स्पष्ट झाले आहे. अक्साई चिनमध्ये बांधलेले रस्तेही रुंद आहेत. याशिवाय चौक्या, आधुनिक वेदरप्रूफ कॅम्प, जेथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे, सोलर पॅनलचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

डेपसांग परिसरातही चीनच्या कारवाया सुरू आहेत. भारतानेही या भागात आपले सैन्य तैनात केले आहे. अहवालानुसार चीन २०३५ पर्यंत शिनजियांग आणि तिबेटला जोडणारा महामार्ग तयार करण्याच्या बेतात आहे. हा रस्ता अक्साई चीनमधून जाणार आहे. महामार्गामुळे चीनची पुरवठा साखळी सुकर होणार आहे.

हे ही वाचा:

परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षानंतर महाराष्ट्र अव्वल!

नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले

‘बिपरजॉय’मुळे पावसाची आणखी प्रतीक्षा

गोव्यात भरणार वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी चकमक सुरू झाल्यापासून चीन येथे मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सीमेवर झालेल्या रक्तरंजित हिंसाचारानंतर दोन्ही देशांमधील संबंध सहा दशके मागे गेले आहेत. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. जोपर्यंत सीमेवर शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनशी संबंध पूर्ववत होऊ शकत नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा