ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा थांबला होता. जवळजवळ संपूर्ण मुंबईत बऱ्याच काळासाठी वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ होती. नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार हा चीनने केलेला हल्ला असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेतील वृत्तसंस्था न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार भारत आणि चीन सीमा विवाद सुरु असतानाच भारताला धमकवण्यासाठी चीनने अशा प्रकारे, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या ‘पॉवर ग्रीड’ वर हल्ला केला. यामुळे मुंबईतील वीजपुरवठा हा काही तासांसाठी बंद पडला होता. मुंबई लोकल,शेअर मार्केट आणि विशेषतः कोविड-१९ च्या काळात अत्यंत महत्वाची असलेली रुग्णालये या सर्व ठिकाणचा वीजपुरवठा बंद पडला होता.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देताना असे सांगितले की, आम्हाला या वृत्ताविषयी कल्पना आहे. परंतु या प्रकारामध्ये चीनचा हात असल्याचे अजून तपासातून उघड झालेले नाही. चीनच्या सरकारकडून पोसल्या गेलेल्या हॅकर्सविषयी आम्हाला कल्पना आहे, असेही ते म्हणाले.
मे २०२० पासून भारत आणि चीनमध्ये सीमाविवाद टोकाला गेला होता. दोन्ही देशांचे सैन्य अनेक महिने समोरासमोर होते. याच काळात ऑक्टोबर मध्ये चीनने अशा रीतीने हल्ला केल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.