मोदींच्या दणक्यामुळे चीनचा काढता पाय

मोदींच्या दणक्यामुळे चीनचा काढता पाय

उभयपक्षी करारात मान्य झाल्याप्रमाणे चीनने पँगाँग त्सो क्षेत्रातून माघार घ्यायला सुरूवात केली आहे. याबाबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

चीनच्या माघारींच्या हालचालींवर भारतीय संरक्षण दलांचे बारिक लक्ष आहे. चीन त्यांच्या बाजूने प्रत्येक वाहन मागे घेऊन जात आहे, प्रत्येक बंकर काढला जात आहे यावर संरक्षण दलांचे लक्ष आहे. दोन्ही पक्ष माघारीच्या पहिल्या टप्प्याची पाहाणी करायला १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा एकत्र भेटणार आहेत.

हे ही वाचा:

एलएसीवर ‘चढलेला पारा’ उतरला?

माघार घेताना प्रत्येक रणगाडा, बंदूक, अगदी बंकरही हलवला जाणार आहे.

भारत आणि चीन पूर्व लडाख मधील पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण परिसरातील नियंत्रण रेषेच्या संदर्भात दोन्ही पक्षांना मंजूर होणारा तोडगा काढण्यात यशस्वी झाले. चीनची माघार फिंगर ४ आणि ८ यांच्या मधील विभागातून माघार घेईल. त्यावेळी तिथे मागील नऊ माहिने बांधलेल्या रचना देखील तोडण्यात येतील आणि चीन त्याचं सैन्य फिंगर ८ च्या पूर्वेला ठेवेल.

भारत आणि चीन फिंगर ४ आणि ८ च्या दरम्यान कोणत्याही तऱ्हेचे टेहळणी पथक पाठवणार नाही. भारताच्या उंचीवरील स्थानांमुळे चीनच्या सर्व हालचालींवर भारत लक्ष ठेवू शकत आहे. यामध्ये चीनचा स्पँगूर तलावाजवळच्या बेस कँपचा देखील समावेश आहे.

याबाबत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे.

Exit mobile version