चीनमधील झिरो-कोविड पॉलिसी अचानक रद्द केल्यापासून तेथील ८० टक्के लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाशी लढणाऱ्या चीनची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली आहे. चीनमधील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली असून कोरोना संसर्ग झपाट्याने देशात पसरत चालला आहे. चीनमधील सुमारे ८०% लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या दोन-तीन महिन्यांत कोविड -१९ संसर्गाची नवीन लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनच्या एका प्रसिद्ध सरकारी शास्त्रज्ञाने शनिवारी ही माहिती दिली आहे.
चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे मुख्य महामारी तज्ज्ञ वू शुन्यु यांनी वेइबो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, चांद्र नववर्षाच्या सुट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात जनतेने प्रवास केल्याने महामारीची शक्यता नाकारू शकत नाही ज्यामुळे काही भागात संसर्ग वाढू शकतो. परंतु, या काळात कोविडच्या नवीन लाटेची अशी कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब
जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय
पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण
महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक
कोरोना रोखण्याच्या उद्देशाने चीनमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण, कोविड नियंत्रणात येण्यापूर्वीच ते शिथिल करण्यात आले होते, त्यानंतर नवीन वर्षाच्या सुट्टीत कोट्यवधी लोक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या राज्याकडे रवाना झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांच्या प्रवासामुळे ग्रामीण भागात साथीचे आजार पसरण्याची शक्यता बळावली असून, तेथे त्याला सामोरे जाण्यासाठी कमी व्यवस्था उपलब्ध आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, चीनने तापाचे दवाखाने, आपत्कालीन कक्ष आणि गंभीर स्थितीत कोविड रुग्णांची संख्या ओलांडली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, चीनने आपले झिरो-कोविड पॉलिसी अचानक मागे घेतल्यानंतर जवळजवळ एक महिन्यानंतर बारा जानेवारीपर्यंत कोविड झालेल्या सुमारे ६०,००० लोकांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. काही तज्ज्ञ म्हणतात की हे आकडे कदाचित या साथीचा पूर्ण प्रभाव दाखवत नाही. कारण त्यामध्ये घरी मरण पावलेल्या लोकांचा समावेश नाही. कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचं लपवण्यास सांगितल्याचा दावाही काही डॉक्टरांनी यावेळी केला आहे.