पुण्यातल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेतीळ मुले फाड फाड स्पॅनिश भाषा बोलतात आणि त्यांनी थेट आता स्पेनला जावे अशी स्वप्ने त्यांची शिक्षिका त्यांना दाखवत आहेत. आपल्याला तर ठाऊकच आहे कि जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे त्या शाळेची अत्यंत दुरावस्था शाळेत असणाऱ्या अपुऱ्या सुविधा पण या सर्व समस्या एका बाजूला ठेवून या शाळेतील शिक्षिका वंदना कोरडे या मुलांना थेट स्पेन देशात जाण्याची स्वप्ने दाखवत आहेत. त्याला कारण पण तसेच आहे. मजुरी करणाऱ्या या मुलांना त्यांनी स्पॅनिश भाषा शिकवून त्यात त्यांनी मुलांना प्रवीण केले आहे.
पुणे जिल्ह्यातल्या गोऱ्हे बुद्रुक या गावातल्या जिल्ह्यापरिषदेच्या शाळेत मुलांना स्पॅनिश हि भाषा शिकवतात. महाराष्ट्रातील हि एकमेव स्पॅनिश शिकवणारी शाळा असून अनेक जण आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या शाळेस नकार देतात. मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी पालक आपल्या मुलांना भरपूर फी भरून मोठमोठ्या शाळेत पाठवतात. त्यांची शिक्षण पद्धती, त्यांच्या शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विदेशी भाषा , त्यांची शिस्त अशा अनेक विविध गोष्टींची भुरळ पालकांना पडते. पण या जिल्हा परिषदेच्या शाळेत वंदना कोरडे या शिक्षिका विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी आणि स्पॅनिश अशा भाषा शिकवतात. शिवाय विविध उपक्रम राबवून आपला विद्यार्थी कुठेही कमी पडू नये याची त्या विशेष काळजी घेतात.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ‘अँथनी अल्बानीज’ भारत भेटीवर
हात उगारण पडलं महागात आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा
नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, क्रू मेंबर्स सुरक्षित
वाढदिवस-महिला दिनानिमित्त वाड्यातील पाड्यांना जावयाची भेट
कशा शिकल्या स्पॅनिश भाषा ?
लॉकडाउनच्या काळांत मोबाईलवर स्वतः वंदना स्पॅनिश शिकल्या. या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी स्पॅनिशच्या वेगवेगळ्या नोट्स पण काढल्या. भाषा शिकणे कठीण आहे पण बोलून बोलून तुम्हाला जमू शकते. म्हणूनच मी मुलांना बारीक सारीक न शिकवता थेट रोजच्या वापरातले शब्द आणि वाक्य शिकवायला सुरवात केली आणि मुलांनी पण त्या शिकून घेतल्या. मोलमजुरी करणाऱ्या ची मुले या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. त्याना त्यांच्या घरात खाण्यापिण्यासाठी रोजचा वेगळा संघर्ष करावा लागतो. शिवाय ते स्वतः शिक्षित नसल्याने त्यांना शिक्षणाची जागरूकता नाही त्यात परदेशी भाषा , स्पेन देश हे सुद्धा माहित नाही. दिवसभर मोलमजुरी करण्या साठी त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही. आणि म्हणूनच या मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी वंदना कोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शिक्षणाची धुरा हाती घेतली आहे.
पालक काय म्हणतात?
आम्ही आज अपुऱ्या शिक्षणामुळे मोलमजुरी करत आहोत हे आयुष्य आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असे या गावातल्या प्रत्येक पालकाला वाटते. आपल्या मुलांच्या शिक्षणातील प्रगती जेव्हा शिक्षक त्यांना सांगतात तेव्हा त्यांना खरंच खूप बरे वाटते. आमच्या मुलांना स्पेनला जायचे आहे. आम्ही परिस्थिती पाहून नक्कीच मुलांना पाठवायचा प्रयन्त करू असे या पालकांचे मत आहे.