बांगलादेशात सध्या मोठा हिंसाचार उसळला असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला आहे. मात्र, तरीही आंदोलक शांत होण्याची चिन्हे दिसत नसून आंदोलकांकडून अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ केली जात आहे. शिवाय विशेषतः हिंदूंना लक्ष्य करून त्यांचे नुकसान केले जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे बांगलादेशात असलेल्या भारतीयांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून कामानिमित्त गेलेले नागरिक आणि विद्यार्थी बांगलादेशात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील काही विद्यार्थी आणि कामानिमित्त गेलेले नागरिक हिंसाचारादरम्यान अडकले असून त्यांना मदत करणे आणि मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास देण्यात आला आहे. तसेच यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं आहे.
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंता यांची माहिती त्यांच्या लोकेशनसह परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चेदरम्यान या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. बांगलादेशातील देशवासीयांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी दिली.
बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते आणि इतरांना मदत करण्यासह त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील, यासाठी विशेष विमानांची… pic.twitter.com/ciBsGRp4Mz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2024
हे ही वाचा:
मैत्रिणीला आयफोन खरेदीकरण्यासाठी ९ वीच्या विद्यार्थ्याचा आईच्या दागिन्यांवर डल्ला !
विनेशच्या बाहेर पडण्यावर नड्डा म्हणाले, ‘संपूर्ण देश तिच्यासोबत आहे, पण हे दुर्दैव…’
जपानला ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; त्सुनामीचाही इशारा
बरेलीमध्ये सीरियल किलर? १४ महिन्यांत ९ महिलांची हत्या !
बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील या बाधितांना जलद गतीने मायदेशात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.