शिवरायांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला

शिवभक्तांची तीव्र नाराजी

शिवरायांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला

उत्तर अमेरिकेतील कैलिफोर्निया मधील सॅन जोस शहरातील एका बागेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेला आहे. ग्वाडालूपे रिव्हर पार्क या प्रसिद्ध शहरातून हा पुतळा गायब असल्याचे तेथील प्रशासनाने ट्विटद्वारे, हि माहिती देऊन त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. पुढे त्यात त्यांनी म्हंटले आहे, पुतळ्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करत , हा पुतळा कधी चोरीला गेला याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. अमेरिकेतील सॅन जोश भगिनींना हा पुतळा पुण्यातून भेट मिळाला होता.

उत्तर अमेरिकेतील मराठा सम्राटाचा हा एकमेव पुतळा इकडे होता म्हणूनच या चोरीच्या घटनेनंतर पूर्ण शहरांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर आम्ही पुतळ्याचा शोध घेत असून शक्य तितक्या लवकर पुतळा शोधून काढू. अशी पार्क प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून या घटनेच्या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस प्रशासन तपास करत आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

सॅन जोस शहर हे पुणे शहरासारखेच आहे. दोन्ही शहरांमध्ये मुख्य साधर्म्य म्हणजे दोन्ही शहरांना समृद्ध वारसा आणि इतिहास आहे शिवाय दोन्ही शहरे शिक्षणाचा केंद्र बिंदू आहे. म्हणूनच सॅन जोस या शहराची ओळख पुणे सिस्टर सिटी म्हणून ओळखली जाते. हा महाराजांचा पुतळा पुणे शहराकडून त्यांना भेट म्हणून मिळाला होता. हा पुतळा हरवल्यामुळे येथील भारतीय नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या संदर्भातील माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल असे उद्यान विभागाने केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Exit mobile version