शिवजयंतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे निघाले आग्र्याला

दिवाण-ए-आम मध्ये 'जय भवानी जय शिवाजी'च्या नाऱ्यांसह साजरी करणार शिवजयंती

शिवजयंतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे निघाले आग्र्याला

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. उद्या ३९३ व्या शिवजयंतीच्या निमित्ताने पहिल्यांदाच खास शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराजांचे सगळे मावळे आग्र्याकडे रवाना होत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती साजरी करण्यासाठी आग्र्याच्या दिवाण-ए-आंम मध्ये छत्रपती महाराजांची जयंती साजरी करण्याची परवानगी मिळाली आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खास उपस्थित राहणार आहेत. आग्र्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवप्रेमी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून रवाना होत आहेत. यासाठी कोणी रेल्वेने तर कोणी विमानाने आग्रा गाठणार आहेत. आग्र्याला या कार्यक्रमाची जोरदार    तयारी सुरु झाली आहे. ‘अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान’ आणि ‘आर.आर.पाटील फाऊंडेशन’ आयोजित करत असलेल्या या कार्यक्रमाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आम मध्ये शिवजयंती साजरी करण्याची मागणी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे विनोद पाटील यांनी पुरातत्व खात्याकडे करण्यात आली होती. परवानगी नाकारल्यावर पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.  राज्य सरकार सहआयोजक असेल तर आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल असं कोर्टाने निर्णय दिल्यामुळे आता आग्र्याला शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होणार आहे. त्यामुळे आता पुरातत्व खात्याने शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच आग्र्यातील दिवाण-ए-आम मध्ये शिवजयंती साजरी केली जाईल. या शिवजयंती उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक उपस्थित राहणार आहेत.

लाल किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व

मराठा साम्राज्याच्या इतिहासात आग्र्याच्या लाल किल्ल्याचे विशेष महत्व आहे. कपटी औरंगजेबाने महाराजांना कैद करण्याचा डाव इकडेच रचला होता. औरंगजेबाने आपल्या वाढदिवसानिम्मित छत्रपतींना आमंत्रित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघेही आग्र्याला पोहोचले मात्र कपटी औरंगजेबाने त्यांना बंदी बनवून ठेवले. तीन महिने बंदी राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्यांचे निष्ठावंत मावळे महाराजांच्या आजाराचे निमित्त करून मिठाईच्या पेटाऱ्यातून पसार झाले तो दिवस होता १७ ऑगस्ट १६६६.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची!! धनुष्यबाण चिन्हही शिंदेकडे!

राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

अधिक युक्तिवादाची गरज .. सत्तासंघर्षांवर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी

शिवजयंती सोहळा डिजिटल स्वरूपात

आग्रा किल्ल्यात सध्या या सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. तिकडे आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहेत. आग्रा येथे हा शिवजयंती सोहळा डिजिटल स्वरूपात दाखवण्यात येणार असून एक कोटी शिवभक्त यात सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या सर्व संदर्भात आयोजकांनी तयारी केली असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वेगळी लिंक उपलब्ध असणार आहे.

Exit mobile version