32 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामाकन्हैयालाल हत्याकांडच्या आरोपींमध्ये पाकिस्तानी

कन्हैयालाल हत्याकांडच्या आरोपींमध्ये पाकिस्तानी

कन्हैयालाल हत्याकांड आरोपींवर आरोपपत्र दाखल

Google News Follow

Related

कन्हैयालाल हत्याकांडमधील आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोह्हम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यादरम्यान नुपूर शर्मा यांचे समर्थन करत सोशल मीडियावर कन्हैयालाल याने पोस्ट केले होते. त्यांच्या या पोस्टनंतर रियाझ अटारी आणि मोहम्मद गौस या दोघांनी कन्हैयालाल तेलीचा जून महिन्याच्या २८ तारखेला त्यांच्या दुकानात काम करत असताना शिरच्छेद केला होता.

तेव्हा त्यांच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आणि नंतर हे फुटेज सगळीकडे व्हायरल झाले होते.
आरोपी हे कट्टरपंथी असून बदला घेण्याच्या उद्देशाने ते भारतात आणि भारताबाहेर असे आपत्तीजनक व्हिडीओ प्रसारित करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. हत्या करण्याच्या उद्देशाने त्यांनी आधीच हत्यारे उपलब्ध करून ठेवली होती.
कन्हैयालालची फेसबुक पोस्ट वाचून त्याच्यावर ठरवून दिवसाढवळ्या हत्या करण्याची योजना त्यांनी आखली. एनआयएच्या तपासात हे उघड झाले आहे की,कन्हैयालालची हत्या पाकिस्तानातील सलमानभाई याने ठरवून नियोजित करून करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

इस्लामाबादमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, एका पोलिसाचा मृत्यू

शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

आजच्या शेतकरी दिनाचं महत्व काय?

आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

या आरोपींमध्ये उदयपूर मध्ये राहणारे मोहम्मद रियाज अटारी, मोहम्मद गौस, मोहसिन खान, आसिफ हुसैन, मोहम्मद मोहसिन, वसीम अली , फरहाद मोहम्मद शेख, मोहम्मद जावेद, मुस्लिम खान आणि सलमान और आणि अबू इब्राहिम हे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा