आयुष्यात एकदा तरी चारधामची यात्रा केली पाहिजे असे अनेकजण म्हणत असतात. चारधामची पवित्र मंदिरे आणि तेथील निसर्ग अनुभवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. उत्तराखंडमधील गढवालच्या हिमालयांच्या रांगांमध्ये असलेले यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही सर्व पवित्र स्थळे म्हणजेच चारधाम. दरवर्षी हजारो भाविक ही चारधाम यात्रा करत असतात. पांडवांनी पण प्राचिनकाळात याच मार्गाने चारधाम यात्रा केली होती असे म्हटले जाते. साधारण ३,००० वर्षांपूर्वीचा हा जुना मार्ग एका २५ जणांच्या ट्रेकर्सने पुन्हा शोधून काढला. हा प्राचिन मार्ग उत्तराखंड सरकार लवकरच जनतेसाठी खुला करणार आहे.
हे ही वाचा:
झाडू मारण्याचे काम करता करता त्या स्टेट बँकेत झाल्या सहाय्यक महाव्यवस्थापक
विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार
अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त
साधारणपणे १९४० पर्यंत हा मार्ग ज्ञात होता त्यावेळी भाविक हरिद्वारपासून यात्रा सुरू करायचे आणि १४ दिवसांमध्ये या चारधाम तीर्थस्थानांचा प्रवास पूर्ण करायचे. कालांतराने येथे वाहन जाण्यायोग्य रस्ते बांधले गेल्यानंतर हा मार्ग सोडून देण्यात आला. परंतु साधारण आठ महिन्यांपूर्वी ट्रेकिंग तज्ज्ञ, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २५ जणांच्या चमूने या जुन्या रस्त्याचा शोध सुरू केला. या पथकाने ऋषिकेश येथून आपला प्रवास सुरू केला. या प्रवासात गढवालच्या टेकड्यांमधील सर्वात कठिण समजले जाणारे २४ विविध भूभाग त्यांनी पार केले. या चमुने १,१५६ किलोमीटरचे अंतर कापत या जुन्या मार्गाने आपली चारधामची यात्रा पूर्ण केली.
धार्मिक पर्यटनाला मिळेल नवा आयाम
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या सर्व प्रवासावरील एक लघुपट आणि पुस्तक प्रकाशित करताना हा जुना मार्ग सर्वांसाठी खुले करण्याची इच्छा व्यक्त केली. या मार्गामुळे राज्याच्या धार्मिक पर्यटनाला एक नवा आयाम मिळेल असा विश्वास व्यक्त केला.