चांद्रयान ३ चंद्रावर नक्की उतरणार; माजी इस्रोप्रमुख सिवन यांना खात्री

चांद्रयान-३ अधिक मजबूत असल्याचा दावा

चांद्रयान ३ चंद्रावर नक्की उतरणार;  माजी इस्रोप्रमुख सिवन यांना खात्री

‘सन २०१९मधील चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशामुळे चांद्रयान-३कडून आपण अपेक्षा कमी ठेवणे योग्य नव्हे. या दोन्ही मोहिमा पूर्णपणे भिन्न आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र यंत्रणा आहे,’ असे स्पष्टीकरण चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणारे के. सिवन यांनी दिले आहे.

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चांद्रयान-३ चंद्रावर उतरवण्याच्या तयारीत आहे. चांद्रयान-३मधील प्रणाली कोणत्याही समस्यांशिवाय सुरळीतपणे कार्यरत आहेत. त्यामुळे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करेल, असा विश्वास के. सिवन यांनी व्यक्त केला. सिवन यांनी चंद्राच्या लँडिंग प्रक्रियेच्या जटिलतेवर प्रकाश टाकला आणि १५ मिनिटांच्या कालावधीत अंतराळयानाचा वेग अंदाजे दोन किलोमीटर प्रति सेकंदावरून शून्यावर आणण्याच्या आव्हानांचे वर्णन केले.

 

वेगाने पृष्ठभागावर उतरणे टाळण्यासाठी वेगातील ही नियंत्रित घट महत्त्वाची असल्यावर त्यांनी भर दिला. या आव्हानांना तोंड देण्यासाठी चांद्रयान-३ मोहिमेची काटेकोरपणे रचना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. चांद्रयान-२ दरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींबद्दलही त्यांनी माहिती दिली. चांद्रयान-२ दरम्यानच्या तांत्रिक त्रुटी चांद्रयान-३ मधून दूर करण्यात आल्या आहेत.

 

हे ही वाचा:

फडणवीसांचे जपानमधून कांद्यावर लक्ष

उत्तर सापडले; म्हणून रजनीकांत योगी आदित्यनाथांचे पाया पडले

बस झाले! विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकात आता बदल नाही

आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज

इस्रोच्या माजी प्रमुखांनी इस्रोच्या वैज्ञानिकांच्या लवचिकतेची प्रशंसा केली. तसेच, ते निराशेतून त्वरित बाहेर येऊन कामाला लागतात, या क्षमतेवरही त्यांनी प्रकाश टाकला. मोहिमेत मिळणाऱ्या माहितींचे विस्तृत विश्लेषण करणे, समस्या ओळखणे आणि सुधारात्मक उपाय लागू करण्याची इस्रोच्या वैज्ञानिकांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दांत त्यांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले.

 

 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ खडबडीत भूभाग आणि खडकाळ पृष्ठभाग आहे. मात्र या आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी चांद्रयान-३चे रोव्हर सुसज्ज आहे, असेही ते म्हणाले. अर्थात, अंतराळ संशोधनामध्ये नेहमीच काही गोष्टी ‘अज्ञात’ असतात, त्यामुळे या मोहिमा आशादायक आणि चिंतादायक अशा दोन्ही असतात, अशी कबुली त्यांनी दिली.

Exit mobile version