25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरदेश दुनियाचांद्रयान- ३ गेले पृथ्वीच्या कक्षेबाहेर

चांद्रयान- ३ गेले पृथ्वीच्या कक्षेबाहेर

चंद्रापर्यंत ३.८ लाख किलोमीटर लांबीच्या प्रवासाला सुरुवात

Google News Follow

Related

चांद्रयान-३ ने चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ३.८ लाख किमी लांबीचा प्रवास सुरू केला आहे. ५ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, असे समजले जात आहे. भारताने १४ जुलै रोजी महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान मोहीम -३ची सुरुवात केली.

चांद्रयानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीच्या कक्षेभोवतीचे भ्रमण करून चंद्राच्या दिशेने प्रयाण केले आहे. आता चांद्रयानाला ३.८ लाख किमी लांबीचा पल्ला गाठायचा आहे. पृथ्वीपासून जवळ असताना (पेरिजी) यानाचा वेग सर्वांत जास्त, तर पृथ्वीपासून सर्वांत लांब असताना (अपोजी) वेग सर्वांत कमी असतो. यान चंद्राच्या कक्षेत झेपावण्यासाठी वेग सर्वाधिक असणे आवश्यक आहे. त्यामुळे या वेगादरम्यानच चांद्रयान चंद्राच्या कक्षेच्या दिशेने झेपावले, ’ अशी माहिती इस्रोने ट्वीटद्वारे दिली.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; विरोधकांना धडकी

आयटीआयमध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण’

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

चांद्रयानाने १४ जुलै, २०२३ रोजी श्री हरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रयाण केले होते. त्यानंतर या यानाची यशस्वीपणे मार्गक्रमणा सुरू आहे. आता पृथ्वीभोवतीची दीर्घवर्तुळाकार फेरी पूर्ण झाली असून आता चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी दीर्घवर्तुळाकार भ्रमण सुरू होईल. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्रोतर्फे सांगण्त आले आहे.

चांद्रयानात चंद्राच्या पृष्ठभागाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेली वैज्ञानिक उपकरणे आहेत, ज्यात तेथील पृष्ठभागाचे गुणधर्म, तेथील वातावरण आणि चंद्रावरील मूलभूत रचना यांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा