‘चांद्रयान ३’ मोहिमेतील लँडर मॉड्युल (विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने रविवारी सांगितले. लँडर मॉड्युल सध्या चंद्राभोवती २५ बाय १३४ किमीच्या कक्षेतून फिरत असून २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी मॉड्युलला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्यात येईल, असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सूर्योदर झाल्यानंतर २३ ऑगस्ट रोजी लँडिंगचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘लँडर मॉड्युल सुस्थितीत आहे. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी चंद्रापासून २५ किमीच्या उंचीवर असताना त्याला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी लँडर मॉड्युल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित आहे. चांद्रयान-३ मोहिमेचे यश हे भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असे इस्रोने म्हटले आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत म्हणतात पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो, तर निवडणूकही लढू
स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !
तिकीट विक्री, वाढलेले हॉटेलचे दर, विमानांचे भाडे यावरून चाहते नाराज !
आतापर्यंत केवळ अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत संघ आणि चीन हे तीन देशच चंद्रावर अवतरण करण्यात यशस्वी ठरले आहेत. परंतु चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप कोणीही उतरलेले नाही. त्यासाठी भारत-रशियामध्ये स्प्रधा होती. चांद्रयानाने लांबचा मार्ग स्वीकारला होता, तर रशियाचे ‘लुना’ हे अंतराळयान केवळ ११ दिवसांत चंद्राजवळ पोहोचले होते. मात्र लुना कोसळल्यामुळे आता भारताचे चांद्रयानच स्पर्धेत उरले आहे.