राज्यात पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता

१८ मार्च पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा वर्तवला अंदाज

राज्यात पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता

पुढच्या पाच दिवसांमध्ये साधारण १८ मार्च पर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. पावसाच्या सरींसह काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.  विदर्भ, मध्य महाराष्ट्र्र, मराठवाडा या प्रदेशांसाठी हा अंदाज वर्तवण्यात आला असून योग्य त्या तयारीत राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. समजा वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्यास बचावासाठी घराबाहेर न पडण्याचे आणि जलाशय तसेच जेथे विजेचा धक्का बसण्याची ठिकाणे आहेत त्या ठिकाणांपासून दूर राहून काळजी घेण्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

याशिवाय विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यासाठीच्या सूचना  पण हवामान विभागाने देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने शेतकऱ्यांना द्राक्ष आणि केळ्यांच्या पिकांना आडोसे देण्याची आणि पिकं सिंचन आणि रासायनिक खतांची फवारणी न करण्याचा सूचना पण देण्यांत आल्या आहेत.  महाराष्ट्रात तुरळक पावसाची काही भागात पावसाची नोंद झाल्याची हवामान विभागाच्या दैनंदिन अहवालातून समोर आले आहे. गोवा  आणि कोकण भागात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले असून, उर्वरित भागांमध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळ राहिल्याचे दिसून आले आहे.

हे ही वाचा:

कौटुंबिक लोकशाही चिरायू होवो…

चीन-पाक निर्मित JK 17 एअरक्राफ्ट खराब, म्यानमारला केला जात होता पुरवठा

पाकिस्तानी तरुणांना नकोसा झालाय त्यांचा देश!

चिनाय कॉलेजची जागा बांधकाम व्यावसायिकांना विकण्याचा घाट; प्रशासक नेमण्याची मागणी

राज्यात सर्वात कमी तापमान पुण्यामध्ये १६.८ अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरी येथे सर्वात जास्त तापमान ३८.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या १४ मार्च ते १८ मार्च या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, कोकण गोवा , मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Exit mobile version