चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकार सतर्क झाले असून त्यांनी राज्यांनाही जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले आहे. या दोन्ही नेत्यांना भारत जोडो यात्रेत कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच हे शक्य नसेल तर देशहिताच्या दृष्टीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
“कोरोना महामारी ही सार्वजनिक आणीबाणी असल्याने भारत जोडो यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो,” असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. “राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर करावा आणि या यात्रेत केवळ कोरोनाची लसीकरण झालेले लोकच सहभागी होतील याची खात्री करावी. अस सल्ला आरोग्यमंत्र्यांनी पत्रामध्ये सल्ला दिला आहे.
हे ही वाचा:
सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर
कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?
९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश
साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’
याच पत्रात मांडविया यांनी पुढे म्हटले आहे की, जर कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य नसेल तर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन देशाला वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशाच्या हितासाठी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येत आहे.