चीनसह अनेक देशांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात आपत्कालीन वापरासाठी केंद्राने नोजल व्हॅक्सिनला मंजूर दिली आहे. हे व्हॅक्सिन बूस्टर डोस म्हणून उपयोगात आणले जाऊ शकते. या निर्णयानुसार नोजल व्हॅक्सिन प्रथम खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
चीनमधील कोरोना उद्रेकानंतर त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्व तयारी करत आहे. आता भारतात पुन्हा एकदा सरकारचे पूर्ण लक्ष कोरोना लसीकरणावर आहे. भारत बायोटेकच्या या नव्या लसीचे नाव iNCOVACC आहे. ही लस भारत बायोटेक आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने संयुक्तपणे तयार केली असून तीन टप्प्यातील चाचण्यांमध्ये ती प्रभावी ठरली आहे. या लसीचा को-विन पोर्टलमध्ये समावेश केला जाणार आहे.
हा विषाणू मुख्यतः नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करतो. ही लस तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या रक्तात आणि नाकात प्रथिने बनवते ज्यामुळे तुम्ही विषाणूशी सहज लढू शकता. सुमारे दोन आठवड्यांनंतर त्याचा प्रभाव तुमच्या शरीरात सुरू होतो. ही लस खूप प्रभावी आहे आणि श्वसन प्रणालीमध्ये कोरोनाविरूद्ध तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करेल असा दावा भारत बायोटेकने या लसीच्या चाचणीनंतर केला होता.
हे ही वाचा :
आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान
आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल
शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना
पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार
इंट्रानोजल लसीची ही आहेत वैशिष्ट्ये
आत्तापर्यंत वापरल्या जाणार्या इतर लसींपेक्षा ही खूप वेगळी आणि प्रभावी आहे.
ही लस नाकातून दिली जात असल्याने, ती नाकामध्ये एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते आणि विषाणू आत प्रवेश करताच निष्क्रिय करते .
आत्तापर्यंत दिलेल्या लसींप्रमाणे याला सुईची गरज भासणार नाही.
हे वापरण्यास देखील सोपे आहे, ते घरी देखील वापरले जाऊ शकते.
लसीसाठी प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचीही गरज नाही.
सुई-संबंधितसंसर्ग, किंवा लसीकरणानंतरच्या वेदना यामध्ये होत नाही
मुलांसाठी आणि प्रौढांसाठी उपयुक्त आहे