परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई

केंद्राने पंजाब सरकारकडून मागवला अहवाल

परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई

खलिस्तान समर्थकांच्या परदेशात बसून भारताच्या विरोधात कारवाई करण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढले आहे. पण आता केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने अत्यंत कडक भूमिका घेत परदेशातल्या खलिस्तान समर्थकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता परदेशात भारताविरुद्ध अपप्रचार आणि कट रचण्याचे खलिस्तान समर्थकांचे मनसुबे पूर्ण होऊ शकणार नाही. परदेशात बसलेल्या खलिस्तान समर्थकांच्या नातेवाईकांवर देखील आता कारवाई होऊ शकते.

पंजाबमधील फुटीरतावादी अमृतपाल सिंग यांच्यावर कारवाई केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात निदर्शने करणाऱ्या आणि तिरंग्याचा अनादर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. केंद्राने पंजाब सरकारला या गोंधळात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यास सांगितले आहे. दोषी आढळल्यास त्यांचे पासपोर्ट रद्द केले जातील असे सांगण्यात आले आहे.

पंजाब पोलीस परदेशात बसलेल्या खलिस्तान समर्थकांच्या नातेवाईकांवरही कारवाई करू शकतात. गरज भासल्यास त्यांच्यावरही एफआयआर दाखल करता येऊ शकणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने १९ मार्चच्या घटनेनंतर आपल्या स्तरावर चौकशी केली होती, भारतीय नागरिकत्व असलेल्या काही लोकांचाही या घटनेत सहभाग होता असं या चौकशीत आढळून आल्याचे दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

हे ही वाचा:

जीएसटीशी संबंधित वाद आता झटपट सुटणार

आता दोन मिनटात बनवा ‘थंडगार बिअर’

हताश पवारांच्या खटपटी ममतांच्या लटपटी…
पहिल्या महिला तिकीट तपासनीसचे कौतुक

या तपासाचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला. त्यानंतर गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, दिल्ली पोलिसांनी यूएपीए आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कलमाखाली एफआयआर नोंदवला आहे . याप्रकरणी स्पेशल सेल आयबीची मदत घेत आहे. या आंदोलनात सहभागी अनेक लोक भारतीय पासपोर्टच्या मदतीने ब्रिटनमध्ये पोहोचले आणि तेथे देशविरोधी कारवाया करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Exit mobile version