सेलिब्रिटी मलायका, नोरा, समंथा, रकुलला आला गाझा पट्टीतील ‘राफा’चा पुळका

माधुरी दीक्षित, रोहित शर्माची पत्नी रितिकाने डीलिट केल्या पोस्ट

सेलिब्रिटी मलायका, नोरा, समंथा, रकुलला आला गाझा पट्टीतील ‘राफा’चा पुळका

इस्रायलने गेले काही महिने गाझा पट्टीवर जोरदार हल्ले केलेले आहेत. हमासने इस्रायलच्या १२०० लोकांची हत्या केल्यानंतर आणि २५० लोकांचे अपहरण केल्यानंतर इस्रायलने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. आता पॅलेस्टाइन निर्वासितांच्या एका समुहावर चुकून इस्रायलने हल्ला केला, त्यात ४५ लोक मृत्युमुखी पडले. त्यावरून भारतातील काही सेलेब्रिटींना प्रचंड दुःख झाले. त्यांनी ऑल आइज ऑन राफा असे वाक्य लिहिलेले एक ग्राफिक शेअर करत पॅलेस्टाइनप्रती सहानुभूती असल्याचे मत व्यक्त केले. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार वाकयुद्ध सुरू आहे.

या सेलिब्रिटिंमध्ये मलायका अरोरा, झरीन खान, सोनम कपूर, कृती खरबंदा, नोरा फतेही, डीक्यू सलमान, समंथा रुथ प्रभू, तृप्ती डिमरी, रकुल प्रीत, राहुल दुआ, वरुण धवन, नितांशी गोएल, उर्फी जावेद, स्वरा भास्कर, अहसास चन्ना अशी यांचा समावेश आहे. हुमा कुरेशी आणि करिना कपूर यांनी युनिसेफने प्रसिद्ध केलेली एक पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केले. गाझा पट्टीतील युद्ध थांबवा असा हा संदेश युनिसेफने दिला होता.

क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका सजदे, माधुरी दीक्षित यांच्यासह आणखी काही सेलिब्रिटींनीही अशीच पोस्ट शेअर केली. पण सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या पोस्ट हटविल्या. आइज ऑन राफा ही पोस्ट टाकल्यानंतर इस्रायलकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. ज्यांच्या नजरा राफाकडे आहेत त्यांनी इस्रायलच्या ज्या लोकांना अद्याप अपहृत केलेले आहे, त्यांच्याबद्दलही विचार करावा, असे त्यात म्हटले आहे.

हे ही वाचा:

निवडणूक निकालाच्या दिवशी पंतप्रधान मोदींची दिनचर्या कशी असते?

पंतप्रधान मोदींनी संदेशखालीच्या महिलांना केला सलाम!

केजरीवाल २ जून रोजी पुन्हा तुरुंगात; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका!

पीएफआयचे माजी प्रमुख ई अबुबकर यांचा जामीनअर्ज फेटाळला!

राफा हा गाझा पट्टीतील दक्षिणेचा भाग आहे. राफाची सीमा इजिप्तशी जोडली गेली आहे. तिथे राफा क्रॉसिंग आहे तिथूनच गाझातील रहिवासी दुसरीकडे जाऊ शकतात. पण इजिप्तने केवळ वैद्यकीय मदत राफातील रहिवाशांना देण्याचे कबूल केले आहे. पॅलेस्टाइन नागरिकांना इजिप्तमध्ये प्रवेशास नकार देण्यात आला आहे.

७ ऑक्टोबरला हमासने मोठ्या प्रमाणावर इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यात अनेक इस्रायली नागरिक मारले गेले. त्यांच्या २५० लोकांनाही अपहृत करण्यात आले होते. अद्याप त्यांना सोडण्यात आलेले नाही. त्यानंतर इस्रायलने जोरदार आक्रमण करत गाझा पट्टीतील हमासचा नायनाट करण्याचा निश्चय केला. त्यानंतर गेले सात महिने इस्रायलकडून हमासच्या सर्व नेत्यांचा, दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. २६ मे रोजी हमासकडून पुन्हा एकदा रॉकेट्स हल्ला करण्यात आला.

आतापर्यंत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ३५ हजार मृत्यू झालेले आहेत.

 

Exit mobile version