भारताने गुगलला मोठा दणका देत कोट्यवधी रुपयांचा दंड ठोकावला आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला १ हजार ३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बाजारपेठेतील स्पर्धा संपवण्यासाठी आपले वर्चस्व वापरल्याचा आरोप गुगलवर करण्यात आला आहे. तसेच, आपल्या चूका सुधारण्यासाठी काही कालावधीही गुगलला देण्यात आला आहे.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने गुरुवार, २० ऑक्टबर रोजी यासंदर्भात माहिती दिली. नॉन ओएस वेब स्पेसिफिक वेब ब्राऊजर मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी गुगलने ऍप स्टोर मार्केटमध्ये आपल्या सद्यस्थितीचा गैरवापर केल्याचं आयोगाचं म्हणणं आहे.
गुगल भारतने संगीत, ब्राउझर, ऍप लायब्ररी आणि अन्य सेवांत वर्चस्व राखण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच, ऍप निर्माता कंपन्यांवर एकतर्फी करार लादले आहे. शिवाय गुगलने अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये काही ऍप दिले आहेत. मात्र, त्यांना डिलीट करण्याचा पर्याय दिला नाही. हे ऍप एकप्रकारे स्मार्टफोन वापरकर्त्यांवर लादण्यासारखे आहे. तसेच गुगलने नवीन ऍपला बाजापेठेत येण्यापासून रोखले आहे, असेही सीसीआयने म्हटलं आहे.
आता गुगलला एक मर्यादित वेळ आखून देण्यात आली असून त्या वेळेत त्यांनी आपण केलेली चूक सुधारावी, असा इशारा आयोगाने दिला आहे. शिवाय १ हजार ३३७ कोटी रुपयांचा आर्थिक दंडही गुगलकडून आकारला जाईल, असंही स्पष्ट केलं आहे.
Competition Commission of India imposes a monetary penalty of Rs. 1337.76 crore on Google for anti-competitive practices in relation to Android mobile device.@CCI_India pic.twitter.com/EVSw6nAPx6
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) October 20, 2022
हे ही वाचा:
पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस
पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक
भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा
समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल
याआधीही गुगलच्या विरोधात चौकशी आदेश काढण्यात आलेत होते. याच महिन्यात गुगलविरोधात चौकशी आदेश देण्यात आले होते. गुगलच्या विरोधात न्यूज ब्रॉडकास्टर्स एन्ड डिजिटल असोसिएशनने एक तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन गुगलबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते.