शबरीमाला मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना भाविकांनी भरलेल्या गाडीचा अपघात झाला आहे . तामिळनाडूच्या भागातून भाविकांनी भरलेल्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
तामिळनाडू येथील शबरीमाला मंदिरात दर्शन करून भाविक कारमधून परतत असताना कार कुमुली टेकडीवर येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला आणि ती खाली ४० फूट खोल दरीत कोसळली, असे जिल्हाधिकारी केव्ही मुरलीधरन यांनी सांगितले. डोंगर मार्गावर वळण घेत असतानां हा अपघात झाला. यामध्ये आठ जण जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की ७ जण जागीच ठार झाले तर एका भाविकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एका अल्पवयीन भाविकाचाही समावेश असून अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.
हे ही वाचा :
माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन
५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत
मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट
मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, थेणी येथे हलवण्यात आले. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जाते. हे भाविक अंदिपट्टी येथील रहिवासी होते.केरळमधील सर्व मंदिरांपैकी हे सर्वात प्रसिद्ध आणि प्रमुख मंदिर आहे.