एका ब्रिटिश गिर्यारोहकाने नवा विक्रम नोंदवला आहे. केंटन कूल या गिर्यारोहकाने सोळा वेळा जगातील सर्वात उंच पर्वत सर केला असून, तो विक्रम करणारा पहिला परदेशी ठरला आहे. ही माहिती केंटन कुल यांच्या मोहिमेचे आयोजन करणाऱ्या हिमालयन गाईड्स नेपाळ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिली आहे.
केंटन कूल हे इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायर येथील रहिवासी आहेत. केंटन कूलने आतापर्यंत सोळा वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. केंटन हे सोळा वेळा माऊंट एव्हरेस्टवर चढणारे पहिले परदेशी गिर्यारोहक ठरले असल्याची माहिती हिमालयन गाईड्स नेपाळ प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक ईश्वरी पौडेल यांनी दिली आहे. २०१३ मध्ये माउंट नुपत्से, माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट ल्होत्से या मोसमात चढाई करणाऱ्या पहिल्या ब्रिटिश गिर्यारोहकाचा विक्रम केंटनच्या नावावर आहे. गेल्या वर्षी केंटनने जगातील सर्वात उंच शिखर सर केल्यानंतर २९ तासांपेक्षा कमी कालावधीत माउंट ल्होत्से शिखर गाठले होते.
हे ही वाचा:
तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर
दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र
रविवार, १५ मे रोजी केंटन आणि इतर दोन परदेशी गिर्यारोहक तसेच पाच नेपाळी मार्गदर्शक पहाटे ५.३० वाजता माऊंट एव्हरेस्टवर पोहचले. तसेच ७ मे रोजी, सुप्रसिद्ध नेपाळी पर्वतीय मार्गदर्शक कामी रीता शेर्पा यांनी २६व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून जागतिक विक्रम केला आहे.