तालिबानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे

तालिबानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे

हिंदू-शिखांनी व्यक्त केल्या भावना

अफगाणिस्तानात तालिबानराज आल्यानंतर तिथे अफरातफर माजली आहे. देशातील नागरिक, मुस्लिम धर्मीय सैरावैरा धावत असताना, तिथले अल्पसंख्यांक विशेषत: हिंदू आणि शीख भीतीच्या छायेत आहेत. मात्र आता तालिबानने  त्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

नुकतंच तालिबानने काबूल इथल्या गुरुद्वारा कमिटीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आश्वास्त केलं. हिंदू आणि शिखांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. त्यांना पूर्ण सुरक्षाही दिली जाईल, असं तालिबानने सांगितलं. परंतु तालिबानच्या या खोट्या आश्वासनांवर कोणीही विश्वास ठेऊ इच्छित नाही.

तालिबानच्या भीतीने काबूलमधील गुरुद्वारात २०० पेक्षा अधिक नागरिकांनी आश्रय घेतला होता. यामध्ये सर्वाधिक हिंदू आणि शिखांचा समावेश होता. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तालिबानने गुरुद्वारा कमिटीसोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्यांना आश्वस्त करत, कोणताही त्रास देणार नसल्याचं सांगितलं.

दरम्यान, तालिबानने जरी सुरक्षेची हमी दिली असली तरी अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, शीख धर्मीयांना भीती कायम आहे. सध्याची अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहिली तरी तालिबानच्या आश्वासनांवर कोणाला विश्वास नाही. तालिबानच्या करणी आणि कथनीमध्ये फरक असल्याचं इथले हिंदू आणि शीख सांगतात. कारण शरिया कायदा लागू करण्याची घोषणा केलेली तालिबान अल्पसंख्याकांना किती स्वातंत्र्य देऊ शकतात हा मोठा प्रश्न आहे.

हे ही वाचा:

शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक

अफगाण फुटबॉलपटूचा ‘असा’ झाला मृत्यू

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दूरसंचार क्षेत्राला होणार फायदा

तालिबानविरोधात ‘नॉर्दर्न अलायन्स’ची स्थापना

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. महिलांवरील निर्बंधांसोबतच तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचं नवं नाव ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हेच नाव तालिबानने १९९६-२००१ मधील आपल्या राजवटीतही दिलं होतं. मात्र, नंतर अमेरिकेसह नाटोच्या सैन्याने तालिबानचा पराभव करत नावात बदल केला.

आता पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने अफगाणिस्तानचं नाव अस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलंय.

Exit mobile version