24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरदेश दुनियायुनिलिव्हर कंपनीच्या ड्राय शॅम्पूपासून कॅन्सरचा धोका

युनिलिव्हर कंपनीच्या ड्राय शॅम्पूपासून कॅन्सरचा धोका

हिंदुस्थान युनिलिव्हरची मूळ कंपनी युनिलिव्हरच्या अडचणी वाढल्या आहेत.

Google News Follow

Related

हिंदुस्थान युनिलिव्हरची मूळ कंपनी युनिलिव्हरच्या अडचणी वाढल्या आहेत. या कंपनीच्या शॅम्पूच्या उत्पादनांपासून कॅन्सरचा धोका असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या कंपनीने अमेरिकेच्या बाजारातून शॅम्पू परत मागवले आहेत. केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्राय शॅम्पूमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढत असल्याच्या बातम्या आल्यानंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत आली आहे.

युनिलिव्हरने आपले ऑक्टोबर २०२१ च्या आधी बनवण्यात आलेले अनेक एरोसोल ड्राय शॅम्पू उत्पादनं माघारी घेतली आहेत. यामध्ये डव्ह, नेक्सस, ट्रेसमे आणि टिग्गी या शॅम्पू उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेले बेन्झिन सापडल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

या आधी जॉन्सन, एजवेल पर्सनल केअर या कंपन्यांनी त्यांच्या गेल्या दीड वर्षांमधील एरोसोल सनस्क्रीन आणि इतर प्रोडक्ट मागे घेतले होते.

ड्राय शॅम्पू म्हणजे काय?

ड्राय शॅम्पूचा उपयोग केस न भिजवता केस साफ करण्यासाठी होतो. ड्राय शॅम्पू हे पावडर किंवा स्प्रेच्या स्वरुपात बाजारात मिळतात. काही ड्राय शॅम्पूमध्ये एरोसोल स्प्रे असतो.

हे ही वाचा:

सितरंग चक्रीवादळाचा कहर, बांगलादेशात ७ जणांचा मृत्यू

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

ड्राय शॅम्पूमध्ये बेन्झिन असल्याचं स्पष्ट झालं. शॅम्पूच्या माध्यमातून बेन्झिन आपल्या शरीरात प्रवेश करु शकतं. त्यामुळे ब्लड कॅन्सर, ल्यूकेमिया या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या उत्पादनांमध्ये बेन्झिन सापडलं आहे, ती उत्पादनं माघार घेण्यात आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा