बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधात कॅनेडियन हिंदूंकडून बांगलादेशी वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने

आंदोलकांकडून ‘शेम शेम बांगलादेश’, ‘मोहम्मद युनूस ए मर्डरर’, ‘हिंदू लाइव्हस मॅटर’ अशा बॅनरसह घोषणाबाजी

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधात कॅनेडियन हिंदूंकडून बांगलादेशी वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने

बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना न्याय आणि संरक्षण मिळावे यासाठी कॅनडाच्या हिंदूंनी मंगळवारी टोरंटोमधील बांगलादेशी वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने केली. थंडीचे वातावरण असूनही, कॅनेडियन हिंदूंची संख्या लक्षणीय होती. बांगलादेशमधील हिंदूंबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी हे सर्व कॅनडियन हिंदू बांगलादेशी वाणिज्य दूतावासाबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी ‘शेम शेम बांगलादेश’, ‘मोहम्मद युनूस ए मर्डरर’, ‘हिंदू लाइव्हस मॅटर’ आणि ‘हिंदू नरसंहार थांबवा’ अशा बॅनरसह घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी कॅनडाच्या, भारतातील सरकारांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी बांगलादेशी सरकारवर दबाव आणण्याची विनंती केली. एएनआयशी बोलताना एक आंदोलक म्हणाले की, “बांगलादेशात ते हिंदूंचा वंशसंहार करत आहेत. महिलांवर हल्ले करत आहेत. आमच्या मुलांवर बलात्कार करत आहेत. ते जे काही करू शकतात ते करत आहेत कारण हिंदू अल्पसंख्याक आहेत त्यामुळेच ते अत्याचार करत आहेत. तेच त्यांनी पाकिस्तानात केले, अफगाणिस्तानात केले आणि आता ते बांगलादेशात करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही जगभरातील आमच्या बंधू-भगिनींना एकत्र आणण्यासाठी आणि आमची चिंता व्यक्त करण्यासाठी शिवाय त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत.”

दुसऱ्या आंदोलकाने सांगितले की, “आज जागतिक मानवाधिकार दिन देखील आहे. कॅनडातील टोरंटो येथील बांगलादेश कौन्सिलसमोर निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही एकसंघ कॅनेडियन हिंदू म्हणून एकत्र आलो आहोत. ३ ऑगस्ट २०२४ पासून बांगलादेशात काय चालले आहे ते आम्ही पाहिले आहे आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत. बांगलादेशने अल्पसंख्याकांची हत्या थांबवावी अशी आमची इच्छा आहे. बांगलादेशने हिंदूंची हत्या थांबवावी, पूजास्थळे जाळणे थांबवावे, महिलांवर बलात्कार करणे, महिलांचे अपहरण थांबवावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला बांगलादेशात शांतता हवी आहे.”

हे ही वाचा : 

सीरियामधून ७५ भारतीयांचे यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार

ईव्हीएमवर दोन वेळा केंद्रात सत्ता भोगली, आता ओरडत आहेत!

ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार!

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

बांगलादेशी वंशाच्या एका हिंदू महिलेनेही एएनआयशी संवाद साधला आणि बांगलादेशातील हिंदूंच्या दुरवस्थेबद्दल तिने चिंता व्यक्त केली. मूळ बांगलादेशी असल्याने वाईट वाटते आणि हे थांबवण्याची गरज आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या ऐतिहासिक उपस्थितीवर प्रकाश टाकत ती म्हणाली, “आम्ही अफगाणिस्तानातून नाहीसे झालो आहोत. आम्ही पाकिस्तानातून गायब झालो आहोत. हीचं वेळ आहे. जर आपण आता वाचलो नाही तर आपण बांगलादेशातूनही नाहीसे होऊ. ही आमची जमीन होती. आमची १४ वी पिढी तिथेच जन्मली. बांगलादेशातील लोकांना त्यांच्याच मायदेशात राहावे लागेल. ते आक्रमणकर्ते नाहीत. ते ब्रिटिश नाहीत. ते त्या भूमीतील मातीचे पुत्र आहेत. त्यांना (हिंदूंना) संरक्षण देण्याची गरज आहे. त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे आवश्यक आहे. आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात जतन केले पाहिजे. आणि त्यांना मारणे थांबवा. आज हिंदूंची काळजी घेतली नाही, तर बांगलादेशातील हिंदू उद्या राहणार नाही,” असं त्यांनी म्हटले.

Exit mobile version