कॅनडाने मानले भारताचे आभार

कॅनडाने मानले भारताचे आभार

भारताने कोविड-१९ लसीचा जगातील विविध देशांना पुरवठा केला आहे. त्यात कॅनडालादेखील भारताने ऍस्ट्राझेनेका या लसींचा पुरवठा केला आहे. त्याबद्दल कॅनडातील टोरंटो शहरातील विविध भागात नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करणारी विविध होर्डिंग्ज झळकली आहे.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

या होर्डिंग्ज वर “भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोविडच्या लसींचा पुरवठा केल्याबद्दल आभार. कॅनडा- भारत मैत्री चिरायु होवो.” असे लिहीले आहे. या होर्डिंग्ज वर हिंदु फोरम, कॅनडा असे नाव देखील झळकत होते.

कॅनडाला भारतात उत्पादन करण्यात आलेल्या ऍस्ट्राझेनेकाच्या ५ लाख लसींची पहिली खेप ४ मार्च रोजी पोहोचली होती. या लसींचे उत्पादन पुणे येथील सिरम इन्स्टिट्युट येथे करण्यात आले आहे. भारत या लसींचे अजून सुमारे १.५ मिलीयन डोस कॅनडाला पाठवणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्र्युडो यांना आश्वासन दिले आहे की भारत कोविड विरूद्धच्या लढ्यात आणि लसीकरण मोहिमेत कॅनडाला संपूर्ण सहकार्य करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना जस्टिन ट्र्युडो म्हणाले की, जगाने कोविड-१९वर विजय मिळवला, तर त्याचे बरेचसे श्रेय भारताच्या अफाट औषध उत्पादनाच्या क्षमतेला आणि ही क्षमता जगासोबत वाटून घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जाईल.

आदर पुनावाला यांनी देखील या महिन्यातच ट्वीट करून जस्टिन ट्र्युडो यांना आश्वस्त केले, की कॅनडाकडून संमती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ कोविशील्ड लसीचा पुरवठा करू, मी वैयक्तिकरित्या यात लक्ष घातले आहे.

Exit mobile version