30 C
Mumbai
Friday, March 28, 2025
घरदेश दुनियाकॅनडा म्हणतोय, भारत सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल

कॅनडा म्हणतोय, भारत सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल

चीन, रशियासह पाकिस्तानचे नाव घेत केला आरोप

Google News Follow

Related

कॅनडा आणि भारत यांचे संबंध ताणलेले असताना आता पुन्हा एकदा कॅनडाने भारतावर आरोप केले आहेत. राजकीय अस्थिरतेला तोंड देत असलेल्या कॅनडामध्ये निवडणुका होणार असून कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने दावा केला की, भारत आणि चीन २८ एप्रिल रोजी होणाऱ्या कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, तर रशिया आणि पाकिस्तानमध्येही असे करण्याची क्षमता आहे.

कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिसने (CSIS) अशा वेळी हे भाष्य केले आहे जेव्हा कॅनडा आणि भारत यांचे संबंध हे अत्यंत ताणलेले असून कॅनडाने भारतविरोधी घटकांवर आणि त्यांच्या भूमीवर कार्यरत असलेल्या खलिस्तानी समर्थकांविरुद्ध निष्क्रियता दाखवली आहे, तसेच खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे हे संबंध ताणलेले आहेत.

कॅनडाकडून करण्यात येत असलेले हस्तक्षेपाचे आरोप भारताने यापूर्वी फेटाळले आहेत, तर चीननेही असाच या आरोपांना विरोध केला आहे. कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिसच्या उपसंचालक व्हेनेसा लॉयड म्हणाल्या की, शत्रू राष्ट्रातील घटक निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत्या प्रमाणात करत आहेत. या निवडणुकीत कॅनडाच्या लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पीआरसी (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) एआय-सक्षम साधनांचा वापर करण्याची दाट शक्यता आहे, लियोड यांचे म्हणणे आहे. शिवाय त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही हे देखील पाहिले आहे की भारत सरकारकडे कॅनेडियन समुदायांमध्ये आणि लोकशाही प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू आणि क्षमता आहे. गुप्त परकीय हस्तक्षेपाच्या संदर्भात ज्या इतर देशांची नावे देण्यात आली ती म्हणजे रशिया आणि पाकिस्तान.

हे ही वाचा..

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

पाकिस्तानने काबीज केलेली काश्मीरची जमीन सोडावी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू- काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकला भारताने सुनावले

धारावी सिलेंडर स्फोटांनी हादरली; रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधील सिलेंडरमध्ये स्फोट

जानेवारीमध्ये, परकीय हस्तक्षेप चौकशीच्या अंतिम अहवालात असा आरोप करण्यात आला होता की भारत हा कॅनडामध्ये निवडणूक परकीय हस्तक्षेपात सहभागी असलेला दुसरा सर्वात सक्रिय देश आहे. न्यायमूर्ती मेरी-जोसी होग यांच्या अध्यक्षतेखालील संघीय निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांमध्ये परकीय हस्तक्षेपाच्या सार्वजनिक चौकशीचा अंतिम अहवाल २८ जानेवारी रोजी ओटावा येथे प्रसिद्ध करण्यात आला होता. हस्तक्षेपाचा आरोप असलेल्या इतर राष्ट्रांमध्ये रशिया, पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश होता. कॅनडा आणि भारत यांनी अनेक दशकांपासून एकत्र काम केले आहे, परंतु दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये आव्हाने होती. यापैकी अनेक आव्हाने दीर्घकालीन होती आणि भारताच्या परकीय हस्तक्षेप कारवायांना सूचित करतात असे त्यात म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
238,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा