कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा अखेर राजीनामा

पक्षांतर्गत विरोध वाढला

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा अखेर राजीनामा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्र्यांनी दिलेला राजीनामा आणि पक्षातील सुंदोपसुंदी यामुळे अखेर ट्रुडो यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रुडो यांनी हा निर्णय घेताना म्हटले आहे की, पक्षाच्या अंतर्गत जी परिस्थिती आहे त्यावरून आगामी निवडणुकात मी योग्य पर्याय नाही हे स्पष्ट होत आहे. पक्षाचा नेता आणि पंतप्रधान म्हणून की पायउतार होण्याचे ठरवले आहे आणि याबाबत मी माझी पत्नी आणि मुलांशी बोललो आहे.

ट्रुडो यांनी हा निर्णय घेतला असला तरी नवा पर्याय सापडेपर्यंत ते लिबरल पक्षाचे हंगामी नेते असतील.

हे ही वाचा:

देशमुखांना मारताना आरोपी आनंद लुटत होते, व्हीडिओ काढत होते!

‘आका’ सोरोसला पुरस्कार, कोणाला आठवले यूपीए सरकार ?

पुण्यात मजार बांधणारे झाले मुजोर, दत्त मंदिराजवळच टाकली चादर!

नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले

एकेकाळचे त्यांचे सहकारी आणि न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (एनडीपी) नेते जगमित सिंग यांनी ट्रुडो यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे म्हटले आहे. कॅनडातील तीन विरोधी पक्ष लिबरल पक्षाच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. संसदेचे सत्र २७ जानेवारीला होणार होते पण नव्या नेत्याच्या निवडीसाठी ४ मार्चपर्यंत ते लांबवण्यात आले आहे.

२०१५ पासून ट्रुडो हे पंतप्रधान आहेत पण काही मुद्द्यांवरून ते अडचणीत सापडले. २०१५ मध्ये त्यांना बहुमत मिळाले होते तर २०१९ व २०२१ मध्ये अल्पमतात त्यांनी सरकार चालवले.

कॅनडात खलिस्तान चळवळीचा मुद्दा गेली काही वर्षे सातत्याने चर्चेत आहे. ट्रुडो सरकारने या खलिस्तानी चळवळीला विरोध केलेला नाही. किंबहुना ही चळवळ भारताविरोधात आणि कॅनडातील भारतीयांविरोधात सुरू असतानाही ट्रुडो सरकारने त्याविरोधात कोणतेही पाऊल उचलले नाही.

Exit mobile version