27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियाकॅनडाने गुडघे टेकले; पंतप्रधान मोदींना निज्जरच्या हत्येचा कट माहित असल्याचा दावा करणाऱ्या...

कॅनडाने गुडघे टेकले; पंतप्रधान मोदींना निज्जरच्या हत्येचा कट माहित असल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताचे केले खंडन

कॅनडामधील ट्रुडो सरकारने निवेदन जारी करत केले स्पष्ट

Google News Follow

Related

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असे वृत्त कॅनडामधील वृत्तपत्राने दिल्याने खळबळ उडाली होती. यानंतर भारताकडून या बातमीमधील दावा फेटाळून लावण्यात आला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, सदर वृत्तपत्रातील विधान हास्यास्पद असून आम्ही हा दावा फेटाळून लावत आहोत. भारताने फटकारल्यानंतर आता कॅनडा सरकार हरदीपसिंग निज्जर प्रकरणात बॅकफूटवर गेले आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येसह कॅनडातील कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा कोणताही पुरावा नसल्याचे कॅनडामधील ट्रुडो सरकारने निवेदन जारी करत स्पष्ट केले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येसह कॅनडातील कोणत्याही गुन्हेगारी कृतीशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे कॅनडाच्या सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. निज्जर यांच्या हत्येचा कथित कट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रचला होता, असा दावा करणाऱ्या एका अनामिक राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याचा हवाला देणाऱ्या एका कॅनडाच्या वृत्तपत्रातील वृत्तानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या योजनेची माहिती देण्यात आल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे.

यानंतर भारताने कॅनडाला खडेबोल सुनावत वृत्तपत्रातील दावे हास्यास्पद असल्याचे म्हटले होते. यानंतर आता कॅनडाच्या सरकारने या आरोपांपासून स्वतःला दूर केले असून या आरोपांबाबत कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या कटाची माहिती होती, असा आरोप कॅनडातील वृत्तपत्र ‘द ग्लोब’ आणि ‘मेल’ या वृत्तपत्राने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने बातमीत केला होता. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात अशा माध्यमांच्या बातम्यांना हास्यास्पद म्हणत हा दावा फेटाळून लावला. अशा प्रकारच्या दाव्यांमुळे भारत आणि कॅनडा यांचे पूर्वीच ताणलेले संबंध आणखी खराब होतात, असंही भारताने स्पष्ट केले होते.

हे ही वाचा:

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ‘गंभीर’; राजधानीत दाट धुक्याची चादर

पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांना घेवून जाणाऱ्या वाहनावर हल्ला, ५० जण ठार!

अखिलेश यादवांनी खोटा व्हिडीओ केला शेअर

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

गेल्या वर्षी, भारत- कॅनडा राजनैतिक संबंध अत्यंत ताणले गेले जेव्हा कॅनडाने हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांचा सहभाग असल्याचे म्हटले. यानंतर भारताने कडक पावले उचलत कॅनडामधील भारतीय मुत्सद्दी अधिकाऱ्यांना तातडीने कॅनडा सोडून भारतात येण्याचे आदेश दिले होते. शिवाय कॅनडाकडे वारंवार पुरावे मागूनही त्यांनी ते कधीही सादर केले नाहीत. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले होते की त्यांच्याकडे भारताविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. दरम्यान, कॅनडाच्या पोलिसांनी दावा केला होता की, भारत सरकारने कॅनडामध्ये गुन्हेगारी कृत्ये घडविण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईचा वापर केला. हे सर्व दावे भारताने कायम फेटाळून लावले असून यात भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध जबरदस्त ताणले गेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा