कोरोनाचे संकट जगभरात असताना, आता विद्यार्थी वर्ग चांगलाच चिंतेत आलेला आहे. लस घेऊनही अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. त्यामुळेच आता वंदे भारतच्या धर्तीवर विमान सेवा सुरु करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कॅनडा सरकारकडून भारतातून येणाऱ्या विमानांवर अनिश्चित काळासाठी निर्बंध आहेत. त्यामुळेच आता अनेक विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत.
कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट चाचणी अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपोर्टकरता दुसऱ्या देशाची फेरी मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वंदे भारत’ सारखी विमान सेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थीवर्ग तसेच इतर प्रवाशांकडून केली जात आहे.
भारतामधून कॅनडाला जायचे झाल्यास मालदीव शिवाय पर्याय नाही. त्यामुळे आधी मालदीवला जावे लागत आहे. हा होणारा खर्च हा अतिशय अवाढव्य असल्यामुळे हा खर्च आता परवडेनासा झाला आहे. मुख्य म्हणजे या निर्बंधामुळे प्रवाशांना व विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
तसेच विद्यार्थ्यांना हा प्रवास न परवडण्याजोगा आहे. कोरोना संक्रमणाआधी भारतातून कॅनडाला थेट जाण्यासाठी ७५ हजार रुपये खर्च येत होता. आता मात्र २.१५ ते २.३० लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळेच हा एकाच बाजूचा प्रवास आता चांगलाच आवाक्याच्या बाहेर जात आहे.
हे ही वाचा:
…..तर विद्यापीठाचा कॅम्पस बॉम्बने उडवून देऊ
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय सुरक्षा तज्ञ नितीन गोखले यांची खास मुलाखत.
म्हणून विराटची ऑडी आहे पोलिसांच्या ताब्यात
मल्लखांबाचा ऑलिम्पिक मार्ग व्हाया जपान
कॅनडामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा प्रवासखर्च म्हणजे चांगलाच भुर्दंड झालेला आहे. खासकरून पालकांच्या खिशाला या अवाढव्य खर्चामुळे भगदाड पाडण्यासारखे आहे. त्यामुळेच आता ‘वंदे भारत’सारख्या सेवेचे नियोजन करण्यात यायला हवे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.