भारताकडून कॅनडामधील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न; कॅनडाचा नवा मुद्दा

आरोपांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय

भारताकडून कॅनडामधील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न; कॅनडाचा नवा मुद्दा

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. खालिस्तानी संघटनेवरून कॅनडाने भारतावर आरोप केले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव होता. आता कॅनडाच्या फॉरेन इंटरफेयरन्स कमिशनने भारतावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भारताने कॅनडामधील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कमिशनने लावला आहे. याशिवाय याची चौकशीही कमिशनने लावली आहे.

कॅनडामध्ये झालेल्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये भारताने हस्तक्षेप केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय कॅनडातील उच्चस्तरीय आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे आता द्विपक्षीय संबंध आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅनडातील ‘फेडरल कमिशन ऑफ इन्क्वायरी इंटू फॉरेन इंटरफेरन्स’ या सरकारनियुक्त आयोगाने निवडणुकांसंदर्भातील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या आयोगाकडून यासंदर्भातलं जाहीर निवेदन जारी करण्यात आलं आहे. आयोगाने कॅनडा सरकारला यासंदर्भातले सर्व कागदपत्र सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

जगज्जेती मेरी कोम हिची बॉक्सिंगमधून निवृत्ती!

राम मंदिरात पहिल्या दिवशी तीन कोटी १७ लाखांची देणगी!

विजय पाटिदारची निवड योग्य, मात्र अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळणे कठीण!

उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!

२०१९ आणि २०२१ या दोन निवडणुकांमध्ये भारताकडून हस्तक्षेप करण्यात आल्याचे आरोप समोर येऊ लागले आहेत. या आरोपांची रीतसर चौकशी करण्यात येणार आहे. गतवर्षी आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, चीन, रशिया आणि इतर देशांकडून कॅनडातील अंतर्गत बाबींमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपांचा तपास नमूद करण्यात आला होता.

Exit mobile version