श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने आपल्या देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
तसेच श्रीलंकेच्या आर्थिक संकट काळात भारताने श्रीलंकेला केलेल्या मदतीबद्दल क्रिकेटपटूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. त्यांनी भारताला श्रीलंकेचा मोठा भाऊ असेही संबोधले आहे.
श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटाबाबत सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना जयसूर्या यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी देशातील परिस्थिती “दुर्दैवी” असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी भारताचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, आपल्या देशाचा शेजारी आणि मोठा भाऊ म्हणून भारताने आपल्याला नेहमीच मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. आमच्यासाठी, सध्याच्या परिस्थितीमुळे जगणे सोपे नाही. भारत आणि इतर देशांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याची आम्हाला आशा आहे.
भारताने आतापर्यंत श्रीलंकेला १९ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. तर भारताने श्रीलंकेला २ लाख ७० हजार मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा केला आहे. आयात आणि सेवा कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करत असताना श्रीलंका गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटात सापडला आहे.
हे ही वाचा:
विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत
यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI
विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही
ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत
सरकारच्या अंमलबजावणीनंतर आणि त्यानंतरच्या कोविड -19 साथीच्या आजारानंतर श्रीलंकेचे आर्थिक संकट अधिक गंभीर झाले. या संकटामुळे इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसची तसेच काही औषधे आणि अत्यावश्यक अन्नपदार्थांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करत सरकारच्या विरोधात श्रीलंकन रस्त्यावर उतरले आहेत.