कॅलिफोर्नियामध्ये तापमानाचा उच्चांक

कॅलिफोर्नियामध्ये तापमानाचा उच्चांक

उत्तर अमेरिकेतील तापमानाने नवे उच्चांक प्रस्थापित केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पाऱ्याने उच्चांक प्रस्थापित केला आहे. फर्नेस क्रिक व्हिसीटर सेंटर येथे ५४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. परंतु अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्विस रेंजर यांनी मात्र हे तापमान नाकारले असून अधिकृत तापमानापेक्षा अधिक नोंद केली जात असल्याचे सांगितले.

या भागातील नागरिक आणि पर्यटक वाढत्या तापमानाने हैराण झाले आहेत. गाडीतील वातानुकूलन यंत्र चालू ठेवूनच गाडी चालवणाऱ्या पर्यटकांनी केवळ वाढलेला पारा दाखवणाऱ्या तापमापकासोबत फोटो काढण्यापुरते गाडीतून बाहेर पडणे पसंद केले होते.

हे ही वाचा:

महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश

एअरटेल ५जी मुंबईत लवकरच सुरु

नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती

खडसेंसाठी महत्वाचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ

येत्या काही काळात पारा चढाच राहणार असल्याचे तेथील हवामानखात्याकडून सांगितले गेले आहे. त्यामुळे या भागातील विशेषतः कॅलिफोर्निया भागातील लहान मुलांना खेळायला बाहेर पाठवू नये असे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच अनावश्यक बाहेर जाणे टाळण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.

पॅसिफिकच्या वायव्य भागामध्ये पसरलेल्या या उष्णतेच्या लाटांनी या परिसराला वेढून टाकले आहे. या लाटांमुळे दक्षिण ओरेगोन भागात मोठ्या प्रमाणात वणवे लागले आहेत. त्यामुळे सुमारे १,२०० घरांना धोका निर्माण झाला आहे. नेवाडा भागाच्या सीमेजवळील भागात मोठ्या प्रमाणात वणवा लागला आहे. उष्णतेमुळे आणि विज कोसळल्यामुळे देखील आग लागली होती, आणि ही आग रविवार पर्यंत १३४ चौ. मैल इतकी पसरली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने या आगीवर नियंत्रण मिळवले. उष्णतेच्या झळांमुळे अमेरिकेच्या या भागात आगीच्या घटना घडल्या आहेत.

Exit mobile version