केबल चॅनेल बंद ? लोक वैतागले

जाणून घ्या खरे कारण

केबल चॅनेल बंद ? लोक वैतागले

झी, सोनी, स्टार या आघाडीच्या वाहिन्या सध्या का बंद आहेत तुम्हाला माहित आहेत का? या सर्व आघाडीच्या वाहिन्यांनी केबल प्लँटफॉर्मवर फीड बंद केल्याने जवळ जवळ साडेचार हजार कोटी ग्राहकांना याचा फटका बसला आहे. ब्रॉडकास्टर्सनी त्यांचे फीड केबल ऑपरेटर कडून बंद केले आहेत कारण ज्या ज्या वाहिन्यांनी नवीन दरवाढ ऑर्डर अंतर्गत असलेल्या नवीन करारांवर स्वाक्षरी केलेली नाही. केबल ऑपेरेटर्स नि सुमारे २५ ते ३५ टक्के खर्च वाढवल्यामुळे करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन अर्थात एआयडीसिएफ हि डिजिटल केबल कंपन्याची सर्वोच्च संस्था असून या करारामुळे ग्राहकांवर अतिरिक्त खर्च होणार आहे. यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा विचार करत आहोत असे सांगण्यात येत आहे.

१५ फेब्रुवारीला नवीन दरानुसार करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती, जी ट्राय द्वारे दिली जाते. पण केबल सेवा प्रदात्यांनी त्या नोटिशींकडे लक्ष न दिल्याने प्रसारण खंडित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. झी, सोनी, स्टार या वाहिन्यांनी एआयडीसिएफ च्या सदस्यांवर तसेच इतरही केबल च्या प्लॅटफॉर्मवर वाहिनीच्या सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. प्रसारकांच्या या अवास्तव किंमती वाढवल्याच्या निषेधार्थ केबल प्लॅटफॉर्मने सुधारित दर कार्यान्वित केले नाही आहेत.

हे ही वाचा:

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…

संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली!

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

या कारवाई मुळे संपूर्ण देशातील साडेचार कोटी केबल टीव्ही वापरणाऱ्या कुटुंबांना सध्या ह्या वाहिन्यांचे प्रसारण होत नाही आहे. बाकीच्या वाहिन्यांचे प्रसारण होत आहे. असे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
इंडियन ब्रॉडकास्टींग अँड डिजिटल फाऊंडेशन आणि ब्रॉडकास्टर्स चे प्रतिनिधित्व करणारी संस्था फीड डिस्कनेक्ट यांनी करण्यास भाग पडून ते म्हणाले, ट्राय ने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केल्यानंतर चार वर्षानंतर ब्रॉडकास्टर्सनी किमतीत वाढ केली होती. बहुतेक डीटीएच आणि केबल ऑपरेटर यांनी आधीच पाच टक्के किमती वाढवल्या आहेत पण काही केबल ऑपरेटर्स नि नवीन करारावर स्वाक्षरी न केल्यामुळे ब्रॉडकास्टर्स ना योग्य सूचना दिल्यानंतर त्यांची सेवा खंडित करावी लागली आहे.

 

Exit mobile version