जगातील सर्वात लोकप्रिय खेळ अशी ओळख असलेल्या फुटबॉलचा विश्वचषक यावर्षी होऊ घातला आहे. कतार येथे हा विश्वचषक होऊ घातला आहे. या विश्वचषकासाठीचे अधिकृत प्रायोजकव बायज्यूज या भारतीय कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे या वेळेचा विश्वचषक बायज्यूज फिफा विश्वचषक २०२२ म्हणून ओळखला जाणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व मिळवणारी बायज्यूज ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे.
बायज्यूज ही कंपनी एड-टेक क्षेत्रात कार्यरत आहे. २०११ साली बायज्यू रविंद्रन यांनी या कंपनीची सुरूवात केली. गेल्या काही वर्षांत या कंपनीला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून त्यांनी यशाची अनेक शिखे पादाक्रांत केली आहेत. अशातच आता त्यांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा जमा झाला आहे.
या डीलबद्दल बोलताना फिफाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी काय मदाती म्हणाले, “FIFA फुटबॉलच्या सामर्थ्याचा उपयोग करून सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याच्या ध्येयाप्रती समर्पित आहे. BYJU’S सारख्या कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. तसेच FIFA विश्वचषक २०२२ या ग्राउंडब्रेकिंग टूर्नामेंटच्या सहयोगाने आम्ही BYJU’S च्या शैक्षणिक संधींना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करण्यास उत्सुक आहोत.”
हे ही वाचा:
पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची होणार सीबीआय चौकशी
‘कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता’
…आणि पंतप्रधान मोदींनी केली चित्रकार आयुषची इच्छा पूर्ण
तर BYJU’S कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायज्यू रविंद्रन यांनी असे म्हटले आहे की, “आम्ही FIFA विश्वचषक कतार २०२२, ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा प्रायोजित करण्यास उत्सुक आहोत. अशा प्रतिष्ठित जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणे, तसेच शिक्षण आणि खेळाच्या एकात्मतेला चॅम्पियन करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खेळ हा जीवनाचा एक मोठा भाग आहे आणि जगभरातील लोकांना एकत्र आणतो. ज्याप्रमाणे फुटबॉल कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे आम्ही या भागीदारीतून प्रत्येक मुलाच्या जीवनात शिकण्याची आवड निर्माण करण्याची आशा करतो.”