शुक्रवार, २७ मे रोजी म्हणजेच आज लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन नदीत पडले. या अपघातात सात जवानांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
२६ जवानांचे पथक परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. गंभीर जखमी जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशीही संपर्क साधण्यात आला आहे.
जखमींवर उपचार सुरू असताना, गंभीर जखमी जवानांना भारतीय हवाई दलाच्या मदतीने उच्च केंद्रात पाठवण्यात आले. या अपघातात आतापर्यंत सात जवानांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
समीर वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश
वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये! मलनिस्सारण विभागात २१ हजार कोटींचा घोटाळा
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास
‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला’
सैनिकांचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत पडले आहेत. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहन नदीत कसे पडले हे अजून अद्याप स्पष्ट झालेले नाही.