इजिप्तच्या बेरनेस बंदरात सापडली रोमन काळातील बुद्धाची मूर्ती

रोमन साम्राज्य- भारतमधील व्यापारी संबंधाची ओळख पटली

इजिप्तच्या बेरनेस बंदरात सापडली रोमन काळातील बुद्धाची मूर्ती

इजिप्तच्या तांबड्या समुद्रावरील बेरेनिस या प्राचीन बंदरात बुद्धाची मूर्ती सापडली आहे. रोमन साम्राज्य आणि भारत यांच्यातल्या व्यापारी संबंधाची ओळख करून देणारी ही मूर्ती दुसऱ्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिश-अमेरिकन मिशनला बेरेनिस येथील प्राचीन मंदिरात उत्खननादरम्यान रोमन काळातील ही बुद्धाची मूर्ती सापडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्तंबूलच्या दक्षिणेकडील भागात उत्खनन करतांना ही मूर्ती आढळून आल्याचे पुरातत्व मोहिमेच्या पथकाचे प्रमुख डॉ. मारियस गोयझाडा यांनी सांगितले.  बुद्ध मूर्तीच्या शोधामुळे रोमन काळात इजिप्त आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध अस्तित्वात असल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळाला. येथे आलेल्या भारतीय व्यापाऱ्यांसाठी हे मंदिर बांधण्यात आले होते, असेही गोयझाडा म्हणाले.

बेरेनिस हे रोमन काळातील इजिप्तमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक होते आणि मसाले, अर्ध-मौल्यवान खडे, कापड आणि हस्तिदंती यांनी भरलेल्या भारतातील जहाजांचे ते गंतव्यस्थान होते, असे पुरातत्व परिषदेचे महासचिव महासचिव डॉ. मुस्तफा वजीरी यांनी सांगितले. बुद्ध मूर्ती बहुधा दक्षिणेकडील भागातून उत्खनन केलेल्या दगडापासून बनविली गेली असावी. इस्तंबूल किंवा ते बर्निसमध्ये स्थानिक पातळीवर बनवले गेले असावे आणि भारतातील श्रीमंत व्यापाऱ्यांनी इजिप्शियन मंदिराला भेट दिले असा अंदाज पुरात्तत्व संशोधक व्यक्त करत आहेत.

इजिप्तच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा १० टक्के आहे. परंतु कोविड महामारीमुळे इजिप्तच्या परिपर्यटनाला मोठा फटका बसला. महामारीपूर्वी, इजिप्तमध्ये दरवर्षी १३ दशलक्ष पर्यटक येत होते. त्यानंतर ही संख्या लक्षणीय घटली. त्यामुळे या नुकसानीमधून बाहेर पाडण्यासाठी इजिप्तने आपल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पावले उचलली आहेत. आत इजिप्तने पुन्हा एकदा पुरातत्व संशोधनाला गती दिली आहे. २०२८ पर्यंत पर्यटकांची संख्या ३० दशलक्षांपर्यंत वाढवण्याचे इजिप्त सरकारचे उद्दिष्ट आहे.

हे ही वाचा:

सहा महिने वाट न पाहताही घटस्फोट दिला जाऊ शकतो

केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी

‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’

इसिसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार

अशी आहे बुद्धाची मूर्ती
मूर्तीच्या पायाजवळ कमळाचे फूल आहे.शोधलेली मूर्ती दगडाची आहे. पुतळा, ज्याच्या उजव्या बाजूचा आणि उजव्या पायाचा काही भाग गहाळ आहे, त्याची उंची ७१ सेंटीमीटर (२८इंच) आहे आणि त्याच्या डोक्याभोवती प्रभामंडल आणि त्याच्या बाजूला कमळाचे फूल असलेले बुद्ध चित्रित करते. मंदिराच्या उत्खननादरम्यान रोमन सम्राट मार्कस ज्युलियस फिलिप्सच्या (इस २४४ ते२४९) काळातील संस्कृतमधील शिलालेख देखील सापडला असल्याचा दावा पुरातत्वशास्त्रज्ञांनी केला आहे .मंदिराच्या उत्खननाच्या दौऱ्यात आणखी शिलालेख देखील सापडले आहेत. हे शिलालेख पहिल्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version