भारताचा शेजारील देश बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळलेला असून आंदोलकांकडून हिंदूंना विशेष लक्ष्य केले जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या या आंदोलनानंतर हसीना शेख यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. मात्र, आंदोलनाचे लोण कमी होण्याची चिन्हे दिसत नसून आता बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम भारतावर होताना दिसू लागला आहे. भारत- बांगलादेश सीमेवरुन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न काही लोक करताना आढळून येत आहेत. दरम्यान, बांगलादेशमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने सीमा बंद करून सुरक्षा वाढवली आहे.
दरम्यान, सीमा भागातून भारतात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका मोठ्या गटाचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने उधळून लावला आहे. यासंबंधीचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. बीएसएफच्या अधिकार्यांनी बुधवारी सांगितले की, पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बांगलादेशींच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.
STORY | BSF thwarts infiltration attempt by large Bangladeshi group in West Bengal
READ: https://t.co/AaU2fvz7Jp pic.twitter.com/vgfOdFbm16
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2024
बीएसएफच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वेकडील राज्यातील अनेक ठिकाणांहून भारताच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे १२०- १४० बांगलादेशी नागरिकांना रोखले आहे. पश्चिम बंगालमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बांगलादेशी ग्रामस्थांचा एक गट आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पोहोचला होता. यामुळे येथे थोडा गोंधळ निर्माण झाला होता परंतु, बीएसएफच्या जवानांनी तातडीने कारवाई केली आणि भारतात घुसरखोरीच्या प्रयत्नात असणार्यांना माघारी पाठवले. पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर, दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कूचबिहार जिल्ह्यांसह एकूण ४,०९६ किमी लांबीच्या भारत- बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेपैकी ९३२.३९ किमीची सुरक्षा बीएसएफ करते.
हे ही वाचा:
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त
कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश
कुस्तीपटू विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम!
विनेश फोगाटसाठी कोणताही नियमांचा अपवाद नाही…तिला रौप्य दिले जाऊ शकत नाही…
दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमधील सुरक्षा दल हाय अलर्टवर आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनाही पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवरून बनावट भारतीय ओळख दस्तऐवज वापरून बेकायदेशीर स्थलांतर करण्याच्या प्रयत्नांच्या शक्यतेबद्दल सतर्क करण्यात आले आहे.