30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामापाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला, २१ कोटींचे हेरॉईन जप्त

पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला, २१ कोटींचे हेरॉईन जप्त

बीएसएफ जवानांनी शेतातून ३.२ किलो वजनाची हेरॉईनची ३ पॅकेट केले जप्त

Google News Follow

Related

पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोनद्वारे पंजाबमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी अमृतसर जिल्ह्यातील बच्चीविंड गावाजवळ ही घटना घडली, जिथे बीएसएफ जवानांनी गोळीबार करून भारतीय हद्दीत घुसलेल्या ड्रोनला गोळीबार केला. यानंतर, बच्चीविंड गावातील शेतात शोधमोहीम राबवण्यात आली, त्यानंतर बीएसएफ जवानांनी शेतातून ३.२ किलो वजनाची हेरॉईनची ३ पॅकेट (ब्लिंकरसह) असलेली बॅग जप्त केली. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. सध्या बीएसएफ जवानांकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

पाकिस्तानी तस्करांनी अमृतसरच्या बच्चीविंड गावाकडे हे ड्रोन पाठवले होते. हे ड्रोन ओळखता यावे आणि ते उचलता यावे यासाठी त्यावर ब्लिंकर बसवण्यात आले होते. पण त्याआधीच हे ड्रोन बीएसएफ जवानांच्या नजरेत आले. बीएसएफच्या जवानांनी पाठलाग करून ड्रोनवर गोळ्या झाडल्या त्यानंतर काही वेळातच हे ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने पुन्हा परत गेले. बीएसएफने जप्त केलेल्या मालावर ब्लिंकर बसवले होते. हे ब्लिंकर जमिनीवर पडताच चमकू लागतात. तस्करानं हरवलेला माळ सापडावा म्हणून पाकिस्तानी तस्करांनी भारतीय तस्करांसाठी सध्या हे तंत्र अवलंबले आहे.

बीएसएफच्या जवानांनी त्याचवेळी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी हा माल बाचीविंड गावातील शेतात पडलेल्या अवस्थेत आढळून आली. काळ्या डिझेल ब्रँडेड पिशवीत टाकले होते. ती उघडली असता त्यात तीन पाकिटे होती. ज्यामध्ये ३.२ किलो हेरॉईन होते. ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे २१ कोटी रुपये आहे.

हे ही वाचा:

सावरकरांबद्दल काँग्रेसकडून पुन्हा अभद्र टिप्पणी, उद्धव ठाकरे काय करणार?

मागून आलेल्या बसने धडक दिल्याने पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

उधमपूरमध्ये पूल कोसळून ८० पेक्षा जास्त जखमी

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे

याआधी मार्च महिन्यातही पाकिस्तानकडून ड्रोन पाठवण्यात आले होते, २७ मार्चच्या रात्री राजाताळ चौकीजवळ ड्रोन दिसल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार करून ते ठार केले होते. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवली असता, खराब झालेल्या ड्रोनसह एक पांढरी पिशवी पोलिसांना सापडली. पिशवीत पिवळ्या रंगाच्या टेपने गुंडाळलेले एक पाकीट सापडले. २३ मार्च रोजी गुरदासपूर सेक्टरमधील मेटला भागात पाकिस्तानने ड्रोन पाठवून घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी जवानांनी गोळीबार करत ड्रोनला मागे वळवले. शोध मोहिमेदरम्यान, जवानांनी एक पाकीट जप्त केले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे होती, या पॅकेटमधून बीएसएफ जवानांनी ५ पिस्तूल, १० पिस्तुल मॅगझिन, ९ एमएमच्या७० राउंड आणि३११ लिहिलेले २० दारूगोळा जप्त केला होता .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा