26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियाबीएसएफकडून चीनी गुप्तहेराला अटक

बीएसएफकडून चीनी गुप्तहेराला अटक

Google News Follow

Related

बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) ने हांन जुनवाई नावाच्या चीनच्या नागरिकाला भारत बांगलादेश बॉर्डरवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे. या हेराच्या अटकेनंतर अतिशय मोठे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. गेल्या दोन वर्षात १३०० भारतीय  सिमकार्ड हान याने खोटे कागदपत्र देऊन विकत घेतले आणि चीनला पाठवले आहेत. त्याचा उपयोग भारतात सायबर अटॅक आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला गेला आहे.

चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतात वरचेवर सायबर हल्ले होतात आणि या हल्ल्यामागे कुठे ना कुठे चीनचा हात असतो हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. बीएसएफने हांन जुनवाई नावाच्या एका चायनीज हेराला अटक केली आहे, जो भारत बांगलादेश सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता.

हांन जुनवाईने दोन वर्षात १३०० भारतीय सिम कार्ड चीनला पाठवले आहेत. हांनने हे सिम कार्ड खोटे कागदपत्र देऊन विकत घेतले होते आणि अंतर्वस्त्रांत लपून तो हे सिम कार्ड चीनला पाठवायचा. इतकंच नाही तर जेव्हा बीएसएफने त्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरण सुद्धा सापडली.

काही दिवसांपूर्वी हांन जुनवाईचा बिझनेस पार्टनर असलेला सन जियांगला लखनऊ एटीएसकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपास यंत्रणांकडून हां जूनवाईचा शोध सुरू होता. त्याला पकडण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करण्यात आली होती. एखाद्या भारतीय नंबरवरून जर फोन आला तर सहजासहजी संशय येत नाही आणि याचाच फायदा घेण्यासाठी भारतीय सिम कार्ड चा वापर केला जात होता.

सायबर तज्ञ आणि वकील प्रशांत माळी यांच्या मते, कोविड काळामध्ये जेव्हा सगळे लोक आपल्या घरी होते आणि ऑनलाइन चलन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्या वेळी अनेकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या सिम कार्डचा वापर करून अनेक छोट्या-मोठ्या आर्थिक फसवणूकी सुद्धा केल्या गेल्या. ज्याची तक्रार कधीच नोंदवली जात नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील हे जिल्हे चिंताजनक…

पंजाबमध्ये बसपा अकाली दल युती

वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपाशी आहे

नक्षलवाद्यांनी जाहीर केली आरक्षणावरील भूमिका, वाचा सविस्तर…

या हेराकडे प्राथमिक तपास केल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. अधिक तपास केल्यास मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चीन आता इंटरनेटच्या माध्यमातून घुसखोरी करतंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.. मात्र या हॅकर्सना आळा घालण्यासाठी आता तपास यंत्रणाही सज्ज झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा