ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले

ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले

ब्रिटनमधील शीख खासदार प्रीत कौर गिल यांनी अमृतसर सुवर्ण मंदिरात झालेल्या विटंबनेनंतर या घटनेला ‘हिंदू दहशतवाद’ म्हटले होते. त्यानंतर ब्रिटनमधील हिंदूंनी याला जोरदार विरोध केला आणि त्यानंतर या खासदाराने तिचे ट्विट डिलीट केले. दोन दिवसांपूर्वी अमृतसर आणि कपूरताला येथील गुरुद्वारामध्ये प्रतिबंधित ठिकाणी प्रवेश केला म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली होती.

ब्रिटनमधील शीख खासदाराने ‘हिंदू दहशतवाद’ बद्दल वक्तव्य केले होते. या ट्विटनंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरू झाली आणि त्यांनी केलेले ट्विट लोकांकडून शेअर केले जाऊ लागले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनीही ब्रिटनमधील शीख खासदार प्रीत कौर गिल यांच्या ट्विटवर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक ब्रिटनमधील हिंदूंनी यावर आक्षेप घेतला.

हे ही वाचा:

शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस

ती म्हणते लाल किल्ला माझा, मला द्या!

बड्या धेंडांकडून १३ हजार कोटी वसूल

पेपरफुटी प्रकरणी आणखी एक पोलिसांकडे ‘डेरे’दाखल

हिंदूविरोधी ट्विट हटवल्यानंतर, खासदार प्रीत कौर गिल यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, “कोणत्याही प्रार्थनास्थळ किंवा समुदायाला अशा प्रकारे लक्ष्य केले जाऊ नये.”

शनिवारी संध्याकाळी अमृतसर येथे तरुणाला लोकांनी बेदम मारहाण केली होती. या तरुणाची बोटे तुटल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर रविवारी सकाळी कपूरताला जिल्ह्यातील गुरुद्वारामध्ये एका तरुणा मारहाण केली.

Exit mobile version