बीबीसी डॉक्युमेंट्रीवर ब्रिटिश खासदाराने केली टीका

ब्रिटनचे खासदार रामी रेंजर यांनी सुनावले खडे बोल

बीबीसी डॉक्युमेंट्रीवर ब्रिटिश खासदाराने केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बीबीसीने बनवलेल्या माहितीपटावरून वाद वाढत चालला आहे. या प्रकरणाचे पडसाद आता ब्रिटनमध्ये उमटत आहेत. काही लोकांना मोदी आणि भारताचे यश पचत नाही अशा शब्दात ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रमुख सदस्य लॉर्ड रामी रेंजर यांनी पुन्हा एकदा बीबीसीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

बीबीसी डॉक्युमेंटरी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या दोन वेळा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांचाच नव्हे तर न्यायव्यवस्था आणि संसदेचाही हा अपमान असल्याची जोरदार टीका खासदार रामी रेंजर यांनी ट्विटमध्ये केली आहे.

बीबीसी डॉक्युमेंटरी दुर्दैवी, चुकीची आणि चुकीची माहिती देणारी आहे. जे मूठभर मोदीविरोधी आहेत त्यांना पंतप्रधान मोदींची बदनामी करण्याशिवाय काही करायचे नाही. पण बीबीसीने खोटा प्रचार करूनही पंतप्रधान मोदी योग्य असल्याचे सिद्ध झाले आणि दोनदा विजयी झाले याकडेही रेंजर यांनी लक्ष वेधले.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

शिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

 

बीबीसी न्यूजने भारतातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान, भारतीय न्यायव्यवस्था, भारतीय पोलिस यांचा अपमान केला आहे.आपण दंगलीचा निषेध करतात पण बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनाचाही निषेध आहे. असल्याचे सांगून रेंजर यांनी बीबीसीने दोन महान राष्ट्रांमधील कामात हस्तक्षेप करू नये असा सल्लाही दिला आहे.

Exit mobile version