लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयावरील भारतीय तिरंगा खलिस्तान समर्थकांकडून उतरविण्याच्या घटनेमुळे ब्रिटनमधील राजकारण तापले आहे. आता तिथले खासदार बॉब ब्लॅकमन यांनी खलिस्तानी चळवळ ही ब्रिटनमधील शीख समुदायाकडून नाकारण्यात आली असून ती केवळ या समाजाचा एक अतिशय छोटासा हिस्सा असल्याचे म्हटले आहे.
ब्लॅकमन यांनी मागे बीबीसीच्या नरेंद्र मोदींसंदर्भातील माहितीपटावरही आक्षेप घेतला होता. त्यांनी आता खलिस्तानी चळवळीला फुटकळ मानले आहे.
तिरंगा उतरविण्याच्या घटनेमुळे जगभरातील भारतीयांमध्ये तीव्र संताप उमटला होता. उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याने खलिस्तानी झेंडा उतरवून पुन्हा तिरंगा फडकावल्यामुळे त्याचे कौतुक झाले होते. भारतातही या घटनेमुळे प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
ब्रिटिश खासदार ब्लॅकमन यांनी म्हटले आहे की, खलिस्तानी हे शीख समुदायातील अतिशय छोटासा भाग आहे. देशातील बहुसंख्य शीख समाज हा खलिस्तानीच्या चळवळीला अजिबात महत्त्व देत नाही. पोलिसांना मी असा संदेश देऊ इच्छितो की, दहशत निर्माण करणाऱ्या या खलिस्तानींना पोलिसांनी अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य कारवाई व्हायला पाहिजे.
हे ही वाचा:
राज्यात अखेर गो आयोगाची स्थापना
रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?
पाटणा रेल्वे स्थानकात दिसली ब्लू फिल्म आणि सगळ्यांनी डोळेच मिटले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात चिनी फॉलोअर्स
रविवारी खलिस्तानी चळवळीतील लोकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवरील तिरंगा खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. उच्चायुक्तालयाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा मुद्दा त्यामुळे चर्चेला आला. उच्चायुक्तालयाने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
गुजरातमध्ये २००२ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बीबीसीने एक माहितीपट तयार केला होता आणि त्यामुळे जगभरात विवाद निर्माण झाला होता. त्यालाही ब्लॅकमॅन यांनी विरोध केला होता. अत्यंत वाईट पत्रकारितेचा हा नमुना आहे, असे ब्लॅकमन यांनी बीबीसीवर टीका केली होती. या माहितीपटाचे प्रक्षेपण बीबीसीवर होता कामा नये कारण बीबीसीची प्रतिष्ठा जगभरात आहे, त्याला धक्का लागेल असे त्यांनी म्हटले होते.