भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा निकराने सामना करत आहे. अशा वेळेस भारताला अनेक देशांनी मैत्री स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. अशाच प्रकारने मोठी मदत घेऊन ब्रिटिश एअरवेजचे एक मालवाहू विमान दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी उतरले. या विमानातून भारताला तब्बल १८ टन वैद्यकीय मदत पाठवण्याता आली आहे. लंडन येथून निघालेले हे विमान दिल्लीला शनिवारी सकाळी ५.४५ वाजता पोहोचले.
ब्रिटिश एअरवेजने दिलेल्या माहितीनुसार यामधून १८ टन वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या ५००० वस्तूंचा समावेश आहे. या वैद्यकीय उपकरणांमध्ये शेकडो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पाठवण्यात आले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इंग्लंडमधील अनेक समाजसेवी संस्थांनी पाठवले आहेत. यामध्ये ऑक्सफॅम, खालसा एड, ख्रिश्चन एड आणि एलपीएसयुके या संस्थांचा समावेश आहे. हे या विमान कंपनीचे भारतासाठी सहाय्य घेऊन आलेले गेल्या दोन आठवड्यातील दुसरे विमान आहे.
हे ही वाचा:
भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक
भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. अनेक वैद्यकीय सुविधांची उणिव भासू लागली होती. मात्र अशा वेळेला भारताने पूर्वी अनेक देशांना केलेली मदत स्मरून जगातील इतर अनेक राष्ट्रांनी भारताला मदतीचा हात पुढे केला होता, आणि ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, चाचणी संच यांची भरघोस मदत भारताला पाठवली होती.