ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित

शहर प्रशासनाकडून दिवाळखोरी घोषित

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित

ब्रिटनमधून मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेले बर्मिगहॅम शहर दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या शहरातील स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा रोखण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच गरज नसलेल्या खर्चावर कात्री लावली आहे. लाखो पौंडांच्या वार्षिक अर्थसंकल्पीय तुटवड्यामुळे शहर प्रशासनाने दिवाळखोरी घोषित केली आहे.

ब्रिटनच्या बर्मिगहॅम नगर प्रशासनावर मजूर पक्षाची सत्ता आहे. १०० हून अधिक नगरसेवक असून इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवकांचा समावेश असलेले हे युरोपमधील सर्वात मोठे स्थानिक प्राधिकरण आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराच्या प्रशासनाने मंगळवारी कलम ११४ नोटीस काढून दिवाळखोरी घोषित केली.

शहरातील नागरिकांचे आर्थिक संरक्षण करणे महत्त्वाचे असून वैधानिक सेवा वगळता नवीन खर्च थांबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नगर प्रशासनाने अंतरिम वित्त संचालक, फिओना ग्रीनवे यांनी स्थानिक सरकार कायद्याच्या कलम ११४ (३) अंतर्गत एक अहवाल जारी केला. समान वेतन खर्च पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे अपुरी संसाधने असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मुंबईत भाजपाकडून ४०० ठिकाणी दहीहंडी उत्सव !

विजयाचे गणितच न समजल्याने अफगाणिस्तानच्या हातून सामना गेला!

आम आदमी पक्षाने पंजाबात इंडी अलायन्सवर घातला घाव

अक्षयकुमारच्या चित्रपटाच्या नावात आता ‘भारत’

समोर अनेक आव्हाने असून, असुरक्षित लोकांना आधार देण्याच्या आमच्या मूल्यांच्या अनुषंगाने रहिवासी अवलंबून असलेल्या मुख्य सेवांना प्राधान्य देऊ, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Exit mobile version