ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग

किंग चार्ल्स हे उपचार सुरू असतानाच त्यांची सर्व अधिकृत दैनंदिन कामे

ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग

किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांच्या ग्रंथींची वाढ झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांना कर्करोग झाल्याचे आढळून आल्याचे बकिंगहॅम पॅलेसने जाहीर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सोमवारी त्यांच्यावर नियोजित उपचाराला सुरुवात झाली असून डॉक्टरांनी त्यांना लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘ते उपचाराबाबत सकारात्मक असून लवकरात लवकर आपल्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी ते उत्सुक आहेत,’ असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

लिव्ह इनची नोंदणी, हलाला, इद्दतवर बंदी….उत्तराखंड समान नागरी विधेयक सादर

औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमीतील मंदिर!

धर्मांतर रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानात सनातन धर्म स्वीकारण्यासाठी व्यासपीठ

औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमीतील मंदिर!

किंग चार्ल्स यांच्या आजाराबाबत कोणतेही अंदाज बांधले जाऊ नयेत, तसेच कर्करोगाने ग्रस्त असलेल्या जगभरातील लोकांना हा आजार समजून घेण्यास मदत मिळावी, यासाठी ही माहिती जाहीर करण्यात आल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. किंग चार्ल्स हे उपचार सुरू असतानाच त्यांची सर्व अधिकृत दैनंदिन कामे आणि कागदपत्रांच्या तपासणीचे काम सुरूच ठेवतील, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात ७५ वर्षीय किंग चार्ल्स यांच्या वाढलेल्या ग्रंथींवर लंडन क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते बर्कहॉल, अबेरडीनशायर येथे असताना त्यांना काही लक्षणे जाणवली होती, त्यानंतर १७ जानेवारी रोजी त्यांना आजार झाल्याचे निदान झाले. किंग चार्ल्स यांनी त्यांच्या कर्करोगाच्या निदानाबाबत प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांना वैयक्तिकरीत्या कळवले आहे. तर, प्रिन्स विल्यम हे वडिलांच्या सतत संपर्कात आहेत. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले प्रिन्स हॅरी यांचे वडिलांशी बोलणे झाले असून ते त्यांना पाहण्यासाठी येत्या काही दिवसांत ब्रिटनला येण्याच्या तयारीत आहेत. तर, ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी किंग चार्ल्स यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version