कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता भारताला ब्रिटनची साथ मिळत असून ब्रिटनने १०० व्हेन्टिलेटर आणि ९५ ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची मदत पोहोच केली आहे. ब्रिटनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचा हा पहिला टप्पा असून अजून मोठी मदत लवकरच भारतात येणार असल्याचं ब्रिटनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोरोना को हराने के इस जंग में यू. के. भारत के साथ है।
Delighted that the first batch of UK medical supplies have now arrived in India to protect the most vulnerable from #COVID19 #ForceForGood | #LivingBridge | https://t.co/Jl5zYqYlLj pic.twitter.com/oQHODbbls4
— Alex Ellis (@AlexWEllis) April 27, 2021
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ब्रिटन हा ‘एक मित्र आणि साथी’ च्या रूपात भारतासोबत आहे असंही ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने भारताला ६०० हून अधिक महत्वाचे साहित्य पाठवण्याचे आश्वासन दिलं आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, भारतावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी त्या देशाला मदत म्हणून शेकडो व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर भारतात पाठवण्यात येणार आहेत. ब्रिटन या काळात भारताचा ‘एक मित्र आणि साथी’ म्हणून काम करेल.
हे ही वाचा:
१ मे पासून भारतात येणार रशियन स्पुतनिक व्ही लस
कोलकाता नाइट रायडर्सचे ‘इशारों इशारों में’
कोरोना झाला तर ‘या’ कंपनीत २१ दिवसांची पगारी सुट्टी
देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र
गेल्या २४ तासात देशात कोरोनाच्या तीन लाख २३ हजार १४४ नव्या रुग्णांची भर पडली तर २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती २८ लाख ८२ हजार २०४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात दोन लाख ५१ हजार ८२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.