पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

ऋषी सुनक यांची भारतीय संस्कृतीशी नाळ जुळली आहे.

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

भारतीय वंशाचे ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक हे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे आहेत. ते हिंदू सण उत्सव साजरे करत असतात त्यांचे व्हिडिओही अनेकदा समोर येत असतात. सध्या त्यांची मुलगी अनुष्का हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. नऊ वर्षांच्या अनुष्काच्या डान्सने कार्यक्रमात उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली होती.

ऋषी सुनक यांची मुलगी अनुष्काने आंतरराष्ट्रीय कुचिपुडी नृत्य महोत्सव २०२२ स्पर्धेच्या ‘रंग’ प्रकारात भाग घेतला होता. या कार्यक्रमात ४ ते ८५ वयोगटातील सुमारे शंभर लोक सहभागी झाले होते. ऋषी सुनक यांच्या पत्नीनेही आंतरराष्ट्रीय कुचीपुडी नृत्य महोत्सव २०२२ मध्ये भाग घेतला होता. याशिवाय सुनक यांचे पालकही नृत्य महोत्सवात सहभागी झाले होते. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यूकेमधील हा सर्वात मोठा नृत्य महोत्सव आहे.

हे ही वाचा :

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!

शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विक्रम गोखले यांना वाहिली श्रद्धांजली

ऋषी सुनक यांचा जन्म यूकेमधील साउथॅम्प्टन येथे एका भारतीय कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्यांची भारतीय संस्कृतीशी नाळ जुळली आहे. ते भारतीय सण उत्सव साजरे करत असतात. त्यांनी साजरी केलेली दिवाळी याचा व्हिडिओ, फोटोही व्हायरल झाले होते. त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयात दारात रांगोळी आणि दिवे प्रज्वलित केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे दोनशे वर्षांच्या इतिहासातील सुनक हे सर्वात तरुण ब्रिटिश पंतप्रधान आहेत. तसेच ब्रिटनचे सर्वोच्च पदावर विराजमान होणारे ते पहिले हिंदू असून त्यांच्या टेबलावर हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली गणेशाची मूर्ती आहे.

Exit mobile version