क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून केले सहाय्य
पीएम केअर फंडात ५० हजार डॉलर इतकी मदत केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स चर्चेत आल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र त्याने आभासी चलनाच्या माध्यमातून (बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी) ४० लाख रुपये भारतासाठी देणगी दिली आहे.
हेही वाचा:
कमिन्सच्या दातृत्वाने मोदी विरोधकांना पोटशूळ
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे काय दिला इशारा?
पप्पूगिरीचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव
ब्रेट लीने यासंदर्भात म्हटले आहे की, सध्याच्या करोनाच्या संकटकाळात लोक ज्या वाईट परिस्थितीत आहेत, ते पाहून मला दुःख होते. ते दुःख दूर करण्यासाठी आपणही काही हातभार लावू शकतो, या हेतूने मी १ बिटकॉइन (४० लाख रु.) मदत देऊ इच्छितो. क्रिप्टो रिलिफमध्ये ही मदत मी देत आहे. त्यातून भारतात ऑक्सिजन आणि इतर आवश्यक सामुग्री विकत घेता येईल.
ली म्हणतो की, भारताला मी नेहमीच माझे दुसरे घर मानत आलो आहे. मला इथल्या लोकांनी जे प्रेम आणि आपुलकी दाखविली आहे, त्यातून भारताबद्दल माझ्या मनात एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
सध्या ब्रेट ली आयपीएलच्या निमित्ताने भारतात असून समालोचन करत आहे. पॅट कमिन्सचे कौतुक करत त्याने आपले म्हणणे पत्राच्या माध्यमातून ट्विटरवर शेअर केले आहे.