मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये

पर्यटन स्थळांच्या बाबतीत लक्षद्वीप मालदीवला टक्कर देत असल्याची चर्चा

मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यानंतर लक्षद्वीपमध्ये काढण्यात आलेले नरेंद्र मोदींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर या फोटोंची आणि लक्षद्वीपची सर्वत्र चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाय पर्यटन स्थळांच्या बाबतीत लक्षद्वीप मालदीवला टक्कर देत असल्याची चर्चा देखील सुरू झाली. यादरम्यान एका मालदीवच्या नेत्याने केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड करू लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४ जानेवारी रोजी लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले होते. एक्स युजर सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. यासोबत त्यांनी लिहिले की, “किती उत्तम पाऊल आहे! मालदीवमधील नव्या चीनचं पपेट असलेल्या सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना मिळेल.” यावर सिन्हा यांच्या पोस्टला उत्तर देताना मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवचे (पीपीएम) नेते जाहिद रमीझ यांनी लिहिले की, “हे पाऊल खूप चांगले आहे. मात्र, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना दिशाभूल करणारी आहे. भारतीय आम्ही देत असलेली सेवा कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? खोल्यांमध्ये येणारा वास हा सर्वात मोठा मुद्दा असेल.”

जाहिद रमीझ यांनी भारतीयांची खिल्ली उडवणारी पोस्ट एक्सवर लिहिल्यानंतर याचा परिणाम म्हणून सोशल मीडियावर बायकॉट मालदीव हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड करू लागला आहे. शिवाय या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक एक्स यूजर्सनी जाहिद रमीज यांच्यावर वर्णद्वेषी वक्तव्य केल्याचा आरोप केला. तसेच अनेक युजर्सनी संताप देखील व्यक्त केला आहे. लोक मालदीववर बहिष्कार टाकण्याबद्दल आणि लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याबद्दल लिहीत आहेत.

हे ही वाचा:

अयोध्येत जमिनींना चढला भाव; किंमती चारपट वाढल्या

निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार, मतदान केंद्राला लावली आग!

मार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!

हॉलिवूड अभिनेत्याचे विमान समुद्रात कोसळले; मुलींनीही जीव गमावला!

मालदीवमध्ये प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नुकतीच सत्तेवर आली आहे. माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव करून डॉ. मोहम्मद मुइज्जू अध्यक्ष बनले आहेत. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यावर भर दिला होता. याउलट मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मालदीवचे भारताशी संबंध बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत.

Exit mobile version