‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’

ओबामांच्या अल्पसंख्याकांच्या टीकेवर निर्मला सीतारामन यांचे प्रत्युत्तर

‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील वांशिक अल्कसंख्याकांचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली होती. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बहल्ले झाले,’ अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतीय मुस्लिमांबद्दल असे वक्तव्य करतात, हे आश्चर्यकारक आहे,’ असे त्या म्हणाल्या.

‘मी सावधपणे बोलत आहे. आम्हाला अमेरिकेशी चांगली मैत्री हवी आहे. परंतु तिथून भारताच्या धार्मिक सहिष्णुतेबद्दल बोलले जाते. कदाचित त्यांच्या (ओबामा) मुळे सहा मुस्लीमबहुल देशांवर बॉम्बहल्ले झाले. सीरिया ते येमेन ते सौदी ते इराक, बॉम्बस्फोट झाले नाहीत का? त्यावेळच्या सात देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि २६ हजार बॉम्ब टाकण्यात आले होते. असे नेते जेव्हा भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर भाष्य करतात, तेव्हा त्यांना कसे गांभीर्याने घ्यायचे?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत

आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज

इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत

यावेळी सीतारामन यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. ‘नेते परदेशात जातात आणि भारताच्या बाजूने बोलत नाहीत. ते पंतप्रधान मोदींना पराभूत करू शकत नाहीत, म्हणूनच वेगळ्या मार्गाने जातात आणि अशा चर्चेचा भाग बनतात,’ असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतच भारतात कोणत्याही भेदभावाला जागा नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केले होते.

Exit mobile version